शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जगमपुरात नालीचे पाणी विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:31 IST

चामोर्शी तालुक्यातील भाडभिडी ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या जगमपूर येथील नाल्यांचा मागील अनेक वर्षांपासून उपसा केला नाही. त्यामुळे पावसाचे पाणी विहिरीच्या सभोवताल जमा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देनाल्यांचा उपसा रखडला : नागरिकांना प्यावे लागतेय गढूळ पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव (म.) : चामोर्शी तालुक्यातील भाडभिडी ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या जगमपूर येथील नाल्यांचा मागील अनेक वर्षांपासून उपसा केला नाही. त्यामुळे पावसाचे पाणी विहिरीच्या सभोवताल जमा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.जगमपूर गावातून जाणारा मुख्य रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. या रस्त्याच्या बाजूला जिल्हा परिषदेने आठ वर्षांपूर्वी नाल्यांचे बांधकाम केले. बांधकामापासून आतापर्यंत नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यासह गावातील अंतर्गत नाल्याही गाळ व कचऱ्याने तुडूंब भरल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी नाल्यांचा उपसा होणे आवश्यक असताना ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले. नाल्यांमधील गाळामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या हातपंप, विहिरी व नागरिकांच्या दारावरून वाहत आहे.चार दिवसांपूर्वी आमगाव (म.) परिसरात दमदार पाऊस झाला. त्यावेळी पावसाचे पाणी रस्त्याच्या लगत असलेल्या विहिरी सभोवताल जमा झाले होते. हेच पाणी विहिरीत गेले. गढूळ पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन नाल्यांचा उपसा करावा, अशी मागणी होत आहे.चामोर्शी तालुक्यात एकूण ७६ ग्रामपंचायती आहेत. यापैकी बºयाच ग्रामपंचायतीमार्फत हद्दीतील गावांमधील नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. काही ग्रामपंचायतींनी पावसाळापूर्व नियोजनच केले नाही. त्यामुळे सांडपाणी विल्हेवाटीची समस्या ऐरणीवर आली आहे.लोकमतने वेधले होते लक्ष२० जून रोजी लोकमतने जगमपूर येथील नाली उपसा न झाल्याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. नाली उपशाबाबत भाडभिडीचे ग्रामसेवक यांना विचारणा केली असता, २४ जून रोजी सभा आयोजित केली आहे. या सभेत नाली उपशाबाबतचा ठराव घेतला जाईल, असे सांगितले होते. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटूनही नाल्या उपसल्या नाहीत. त्यामुळे अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण