शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

लग्नाच्या चाैथ्या दिवशी बुडून नवरदेवाचा मृत्यू

By दिगांबर जवादे | Updated: June 11, 2024 22:06 IST

साळ्याला वाचविताना भाऊजीचाही मृत्यू

दिगांबर जवादे, गडचिराेली : लग्नानंतर भामरागड तालुक्यातील बिनागुंडा धबधब्यावर पत्नी व इतर नातेवाईकांसाेबत फिरायला आलेल्या नवरदेवाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला वाचविताना भाउजीचाही मृत्यू झाल्याची घटना ११ जून राेजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.नवनीत राजेंद्र धात्रक (२७) रा. चंद्रपूर असे साळ्याचे तर बादल श्यामराव हेमके (३९) रा. आरमाेरी असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

नवनीत यांचे ७ जून राेजी लग्न झाले. लग्नानंतर ते बादल हेमके यांच्या घरी आले. बादल हे भामरागड तालुक्यातील पल्ली ग्राम पंचायतमध्ये ग्रामसेवक हाेते. ते भामरागड येथे राहत हाेते. हेमके व धात्रक यांचे कुटुंब बिनागुंडा येथे फिरण्यासाठी गेले हाेते. नवनीत हा धबधब्यात आंघाेळ करत असताना खाेल पाण्यात गेला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बादल हेसुद्धा पाण्यात उरतले. मात्र दाेघांनाही पाेहता येत नसल्याने दाेघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबतची माहिती लाहेरी पाेलिस मदत केंद्राला देण्यात आली. दाेघांचेही मृतदेह भामरागड येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. लाहेरी पाेलिस मदत केंद्रात संपूर्ण कुटुंबाचे बयाण घेतले जात हाेते.

मेहंदी मिटण्यापूर्वीच पतीचा मृत्यूलग्नाला अगदी चार दिवस झाले हाेते. नवनीत व त्यांची पत्नी दाेघेही फिरण्यासाठी बिनागुंडा येथे आले हाेते. दाेघांनीही सुखी संसाराचे स्वप्न बघितले हाेते. मात्र हे स्वप्न अधुरेच राहिले. अवघ्या चार दिवसांतच नवनीतने जगाचा निराेप घेतला. त्यामुळे नवविवाहितेवर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे.

कठडे लावण्याची गरजबिनागुंडा येथील धबधबा दिसायला अतिशय लहान आहे. मात्र या धबधब्यात उन्हाळ्यातही जवळपास १५ ते २० फुट पाणी असते. धबधब्याची ही खाेली लक्षात येत नाही. त्यामुळे धबधब्यात बुडून मृत्यू हाेतात. यापूर्वी भामरागड तालुक्यात कार्यरत असलेल्या नागालॅंड येथील डाॅक्टरचा मृत्यू झाला हाेता. भविष्यातही अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने या ठिकाणी लाेखंडी खांब उभारावेत. जेणेकरून नागरिक खाेल पाण्यात जाणार नाही, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.पाेहता येत नसल्याने झाला घातमृतक नवनीतला पाेहता येत नव्हते. तरीही ताे खाेल पाण्यात गेला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न बादल यांनी केला. बादल यांनाही पाेहता येत नव्हते. साळ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात भाऊजीचासुद्धा मृत्यू झाला. एकाच नात्यातील दाेघांचा मृत्यू झाला. हेमके व धात्रक कुटुंबावर शाेककळा पसरली आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू