शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

दत्तक ग्राम येवलीचा विकास आराखडा मंजूर

By admin | Updated: June 10, 2015 01:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत येवली गावाचा ग्राम विकास .....

आदर्श सांसद ग्राम योजना : गावात विविध दाखल्यांचे वाटप होणारगडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत येवली गावाचा ग्राम विकास आराखडा ८ जून रोजी खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ग्राम विकास आराखड्यावर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी ग्राम विकास आराखड्यात समाविष्ट असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावे, गावात दारूबंदी, गुटखाबंदी करावी, तसेच गावातील प्रत्येक नागरिकास सातबारा व इतर आवश्यक दाखले मोफत वितरित करण्यासंदर्भात गडचिरोलीचे तहसीलदार यांना निर्देश दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर योजनेची खऱ्या अर्थाने या कार्यक्रमातून मुहूर्तमेढ रोवण्यात आली, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात बांधकाम, आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पशुधन विभाग, ग्राम पंचायत, पोलीस विभाग आदींचाही आढावा घेण्यात आला. खा. अशोक नेते यांनी सांसद आदर्श ग्राम विकास योजनेचा दृष्टिकोन अतिशय चांगला आहे. ग्राम विकास आराखडा तयार करून विकासाकरिता आवश्यक भौतिक व मूलभूत सुविधांचा समावेश केल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. आराखड्यात समाविष्ट कामे विहीत मुदतीत करण्यासाठी प्रत्येक विभागाने दर महिन्याला अहवाल द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. या संपूर्ण नियोजन आराखड्याचे वाचन व संचालन उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी व्ही. यू. पचारे, तहसीलदार जाधव, सरपंच गीता विजय सोमनकर, उपसरपंच सुरेखा रुमाजी भांडेकर, बाबुराव कोहळे, विलास भांडेकर, ग्रा. पं. सदस्य व सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)