शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दारू व खर्रा विक्रेत्यांना ग्रामसभेचा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:25 IST

तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या आदिवासीबहुल जांभळी गावाने दारू व खर्रा विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी गुरुवारी २२ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा घेतली. या सभेत दारू व खर्रा बंदीचा ठराव सवार्नुमते पारित करण्यात आला.

ठळक मुद्देजांभळी गावात ठराव पारित : गावात काढणार जनजागृती रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या आदिवासीबहुल जांभळी गावाने दारू व खर्रा विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी गुरुवारी २२ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा घेतली. या सभेत दारू व खर्रा बंदीचा ठराव सवार्नुमते पारित करण्यात आला. तसेच दारू आणि खर्रा विकताना आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही करण्यात आली. गाव संघटन आणि तालुका मुक्तिपथ चमूच्या सहकार्यातून ही ग्रामसभा घेण्यात आली.जांभळी या गावाला स्मार्ट गाव म्हणून राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. हागणदारी मुक्त गाव या गावाची ओळख आहे. येथील ग्रामसेवक के. के. कुलसंगे यांना राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला आहे. असे असतानाही गावात दारू व खर्रा विक्री होत असल्याने गावाचे शारीरिक आणि सामाजिक स्वास्थ धोक्यात आले होते. त्यामुळे मुक्तिपथ चमूने दारू व तंबाखू सेवनामुळे होत असलेले दुष्परिणाम लोकांना वारंवार समजावून सांगितले. महिलांना दारूमुळे होत असलेल्या त्रासाची जाणीवही त्यांनी लोकांना करून दिली. त्यामुळे गावातून दारू व खर्रा हद्दपार करण्यासाठी गाव संघटनेच्या सहकायार्तून लोकांनी एकत्र येऊन २२ रोजी विशेष ग्रामसभा घेतली. या सभेत गाव पूर्णपणे दारू व खर्रा मुक्त करण्याचा ठराव घेण्यात आला. दारू व खर्रा बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी सोमवार २६ नोव्हेंबर रोजी गावातून रॅली काढली जाणार आहे. या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन ग्रामसभेत करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक के.के. कुलसंगे, सरपंच रत्नमाला बावणे, ग्रामसभा अध्यक्ष मधुकर मडावी, हेमंत मडावी, पुरुषोत्तम बावणे, नरेश माथोरे, नाजूक मडावी उपस्थित होते.विक्रेत्यांवर दंडाचा बडगादारू व खर्रा विक्रेत्यांवर यापुढे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. २५ नोव्हेंबर पर्यंत दारू विक्रेत्यांना त्यांच्याजवळील साठा संपविण्याची सक्त ताकीद ग्रामसभेत देण्यात आली. यानंतर एखाद्याकडे दारू आढळल्यास सुरुवातीला दोन हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. दुसऱ्यांदा आढळल्यास चार हजार रुपये तर तिसऱ्यांदा आढळल्यास थेट पोलीस कारवाईची तरतूद ठरावात नमूद करण्यात आली आहे. त्याचप्रकारे खर्रा विक्रेत्यांनाही १ डिसेंबर पर्यंत त्यांच्याकडील साठा संपविण्याची ताकीद देण्यात आली आहे. त्यांच्यावरही दंड आकारण्याची तरतूद या ठरावात आहे. ठरावाचे पालन न करणाºयांना ग्रामपंचायतीच्या सुविधांपासून वंचित राहावे लागणार असल्याचेही सांगण्यात आले.महिलांची विशेष ग्रामसभागावात विकल्या जाणाऱ्या दारूचा जास्त त्रास हा महिलांना सहन करावा लागतो. अनेकदा दारूमुळे घरी भांडणे होतात. त्यामुळे दारूबंदीसाठी महिलांनी पुढाकार घेण्यासाठी बुधवारी महिलांची विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती. दारूबंदीची आवश्यकता गावसंघटनेने त्यांना समजावून सांगितली. गावातून दारू हद्दपार करण्यासाठी ग्रामसभेला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे यावेळी महिलांनी सांगितले.

टॅग्स :liquor banदारूबंदी