शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेतर्फे दारू व खर्राबंदीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:18 IST

पाऊस सुरू असतानाही पावसाची पर्वा न करता इरुपटोला, मुरुमाडी, मंगेवाडा या तिन्ही गावचे लोक मुरुमाडी गावात ग्रामसभेसाठी एकत्र जमले होते.

ठळक मुद्देविक्रेते व मद्यपींना दंड : इरुपटोला गटग्रामपंचायतअंतर्गत मुरमाडीत ग्रामसभा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : पाऊस सुरू असतानाही पावसाची पर्वा न करता इरुपटोला, मुरुमाडी, मंगेवाडा या तिन्ही गावचे लोक मुरुमाडी गावात ग्रामसभेसाठी एकत्र जमले होते. ही ग्रामसभा घरकुल किंवा शेळ्या मेंढ्या वाटपाची नव्हे, तर दारु व खर्रा बंदीची ग्रामसभा असूनही येथे ३०० ग्रामस्थ उपस्थित होते हे विशेष. इरुपटोला ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या ग्रामसभेमध्ये २१ सप्टेंबर रोजी दारू व खर्रा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला बचत गट व मुक्तिपथ गाव संघटना यांच्या पुढाकारातून या सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेला जिल्हा परिषद सदस्य लता पुंगाटी, मालेवाडा पोलीस मदत केंद्राचे पोलीस निरीक्षक आर. के. जाधव, मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर, धानोरा तालुका संघटक सागर गोतपागर, संघमित्रा ढवळे, संदीप नरोटे व तिन्ही गावातील पोलीस पाटील, सरपंच उपस्थित होते. यावेळी गटग्रामपंचायतीच्या तिन्ही गावात दारू व खर्रा विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. विक्री सोबतच दारू पिऊन, खर्रा खाऊन सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्यांनाही शिक्षा होणार असल्याचे घोषित करण्यात आले. गावांमध्ये कोणीही खर्रा किंवा दारू विक्री करताना आढळल्यास त्यांना पहिल्या वेळी पाच हजार रुपये दंड, तर दुसºयांदा दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. तिन्ही गावातील गाव संघटना या नियमांची अंमलबजावणी व पाठपुरावा करतील व गावात लक्ष ठेवतील, असे ग्रामसभेत ठरविण्यात आले. पोलीस विभागातर्फे आवश्क ती मदत केली जाईल, अशी ग्वाही उपस्थित पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली. यावेळी इरुपटोला येथील जिजामाता हायस्कूल व मुरुमाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुले उपस्थित होते. त्यांनी गावात रॅली काढून दारू व तंबाखूमुक्तीचा संदेश दिला.आम्ही आमच्या गावातील दारू बंद करत आहोत, परंतु शेजारील सायगाव, इरपुंडी, तळेगाव, इरुपढोडरी, सूरसुंडी या गावांची दारू पोलिसांनी बंद करावी, असे आवाहन इरुपटोला, मुरुमाडी, मंगेवाडा गावातील महिलांनी पोलिसांना केले आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी