शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

राज्यात कोरोनामुळे रखडललेल्या ग्रामपंचायत निवडणुका होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 18:55 IST

राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया आता पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने परिस्थितीची चाचपणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाकडून चाचपणी१९ जिल्ह्यात मुदत संपली

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया आता पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने परिस्थितीची चाचपणी सुरू केली आहे. ज्या गावांमधील निवडणूक प्रक्रिया थांबली आहे त्या गावांमध्ये कोरोनाची काय स्थिती आहे याची विचारणा निवडणूक आयोगाने संबंधित जिल्ह्यांकडे केली आहे.एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित १५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यातच जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार प्रक्रियाही सुरू झाली होती. १७ मार्च रोजी उमेदवारांच्या अर्जांची छाननी होत असताना सदर प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत आहे त्या स्थितीत ठेवण्याचा आदेश धडकला. दरम्यान कोरोना लवकर आटोक्यात येणार नाही हे लक्षात आल्याने निवडणुकीची आचारसंहिता हटवून संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासकांचीही नियुक्ती करण्यात आली.

आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्देश मिळाल्याने सद्यस्थितीचा अंदाज घेऊन रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका घेण्याचे विचाराधीन असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.आता कोणत्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे, कुठे मतदान घेणे शक्य आहे याबाबतचा विस्तृत अहवाल २१ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली आहे.

या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेशग्रामपंचायतींमधील निवडणूक प्रक्रिया अर्धवट स्थितीत थांबलेल्या जिल्ह्यांमध्ये राज्यभरातील १९ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, वर्धा व गडचिरोली तसेच बाकी भागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक