शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आविका संस्थांचे कर्मचारीच करतात धानाचे ग्रेडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 22:38 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत दरवर्षी खरीप व रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी केली जाते.

दिलीप दहेलकर गडचिरोली :  आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत दरवर्षी खरीप व रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी केली जाते. यावर्षी सुद्धा गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालय मिळून जिल्हाभरात महामंडळाचे ८६ केंद्र मंजूर असून अनेक केंद्रांवर धानाची आवक होत आहे. मात्र महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालय व शासनाने प्रतवारीकरांची (ग्रेडर) ७० वर रिक्त पदे न भरल्यामुळे आविका संस्थांच्या कर्मचा-यांकडूनच धानाचे ग्रेडींग करावे लागत आहे.जे काम प्रशिक्षित ग्रेडरने करायचे आहे, ते काम अल्पप्रशिक्षणातून संस्थांचे कर्मचारी कसे करू शकतात? असा प्रश्न निर्माण झाला आहे.महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत धानोरा, कुरखेडा, कोरची, घोट, देसाईगंज, आरमोरी आदी उपप्रादेशिक कार्यालये आहेत, तर अहेरी प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत मुलचेरा, अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या पाच तालुक्यात धान खरेदीचा कारभार सांभाळला जातो. जिल्हाभर हे काम चालत असताना महामंडळाच्या कार्यालयांमध्ये प्रतवारीकारांसह अनेक पदे रिक्त आहेत.परिणामी आविका संस्थांचे कर्मचारी तसेच सचिव व इतर पदाधिका-यांवर धान खरेदीच्या ग्रेडींगची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना महामंडळातील रिक्त व नियमित पदे भरण्याकडे सरकारचे कायम दुर्लक्ष होत आहे. यंदाच्या खरीप हंगामात गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५० खरेदी केंद्र तर अहेरी उपविभागात ३६ केंद्र मंजूर आहेत. धान खरेदीचे मोठे काम महामंडळाकडे असताना शासनाने ग्रेडरची नियमित पदे भरण्याची कार्यवाही गेल्या १० वर्षांपासून केलेली नाही.महामंडळाकडे केवळ २३ प्रतवारीकारआदिवासी विकास महामंडळाचे गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत पाच उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील केंद्रांसाठी ग्रेडरची (प्रतवारीकार) ६५ पदे मंजूर आहेत. यापैकी १३ पदे भरण्यात आली असून ५२ पदे रिक्त आहेत. अहेरी कार्यालयाअंतर्गत ग्रेडरची ३० पदे मंजूर आहेत. मात्र येथे १० पदे भरण्यात आली आहेत. जिल्हाभरातील खरेदी केंद्रांसाठी महामंडळाकडे नियमित स्वरूपाचे व पात्रताधारक केवळ २३ प्रतवारीकार कर्तव्यावर आहेत.क्विंटलमागे पाच रुपये कमिशनआदिवासी विकास महामंडळाच्या नाशिक कार्यालयाने धान खरेदीतील ग्रेडिंगचे अधिकार आदिवासी विविध कार्यकारी संस्थांना दिले आहेत. प्रतिक्विंटल ५ रुपये प्रमाणे कमिशनची रक्कम संबंधित संस्थांना महामंडळाच्या कार्यालयाकडून अदा केली जाते. संस्थेचे कर्मचारी तसेच सचिव व इतर पदाधिकारी ब-याच केंद्रांवर ग्रेडरची भूमिका बजावत आहेत. गडचिरोली येथे आविका संस्थेच्या कर्मचारी व पदाधिका-यांना त्यासाठी अल्पसे प्रशिक्षण देण्यात आले आहे. परंतु हे प्रशिक्षण पुरेसे आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.