शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

मॉडेल स्कूल सुरू ठेवण्यावर राज्यपालांची सकारात्मक भूमिका

By admin | Updated: July 9, 2015 01:40 IST

जिल्ह्यातील मॉडेल स्कुल पुर्ववत सुरू ठेवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंगळवारी ....

पारोमिता गोस्वामी यांची माहिती : वित्तमंत्र्यांशीही झाली चर्चागडचिरोली : जिल्ह्यातील मॉडेल स्कुल पुर्ववत सुरू ठेवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंगळवारी राजभवनात राज्यपाल डॉ. सी. विद्यासागरराव यांची भेट घेतली व त्यांच्याशी गडचिरोली जिल्ह्यातील पाच मॉडेल स्कूल सुरू ठेवण्याच्या संदर्भात चर्चा केली. राज्यपालांनी या प्रश्नावर अतिशय सकारात्मक भूमिका घेतली.पालकांनी राजभवन येथे राज्यपाल विद्यासागरराव यांचेसोबत चर्चा केल्यानंतर मंत्रालयात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यामुळे मॉडेल स्कुलमध्ये नवीन प्रवेश सुरू होऊन सदर शाळा कायम राहण्याची आशा निर्माण झाली आहे.गडचिरोली या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्ह्यात २०११-१२ पासून केंद्र शासनाच्या अर्थसहाय्याने पाच मॉडेल शाळा सुरू करण्यात आल्या होते. सदर शाळा जिल्ह्यातील भामरागड, सिरोंचा, धानोरा (मोहली), एटापल्ली व आलापल्ली या पाच ठिकाणी सुरू होत्या. या शाळांमधून पहिल्यांदाच अतिदुर्गम आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळत होते. मात्र यावर्षी अचानक या शाळा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. व येथील विद्यार्थ्यांचे समायोजन जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्याचे आदेश शासनस्तरावरून देण्यात आले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील पालक, विद्यार्थी व गावकऱ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर १ जुलैपासून शाळा पूर्ववत सुरू ठेवण्याचे आश्वासन शासनस्तरावरून देण्यात आले. मात्र नवीन प्रवेश न घेता हळुहळु ही शाळा बंद करण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असल्याने पूर्वीप्रमाणे सहाव्या वर्गापासून शाळा सुरू ठेवावी ही मागणी घेऊन मुंबई येथील राजभवनमध्ये राज्यपाल विद्यासागरराव यांची श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात शिष्ठमंडळानी भेट घेतली.गडचिरोलीचा मानव विकास निर्देशांक देशात सर्वात कमी असल्याने शाळा पुर्ववत सुरू ठेवण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. या मागणीची राज्यपालांनी दखल घेत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चा केली व या मागणीकडे त्यांनी शासनाचेही लक्ष वेधले. या बैठकीत राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मंत्रालयात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अध्यक्षतेखाली मॉडेल स्कुल सुरू ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. वित्तमंत्र्यांनी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांना विशेष बाब म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत या शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. या बैठकीत अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, विजय कोरेवार, सिताराम बडोदे, ईश्वर पुंगाटी, विद्याथीर्नी कोमल नरोटे, विनोद गंपावार, संगिता गेडाम, दौलत मडावी, सुधाकर तोडासे, महेश तिवारी आदी सहभागी होते. निर्णयामुळे शाळा सुरू होतील. (जिल्हा प्रतिनिधी)