शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष

By admin | Updated: April 23, 2016 01:17 IST

जिल्ह्यात मागील दहा वर्षांत कधी नव्हे एवढी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

आनंदराव गेडाम यांची टीका : कुरखेडा येथे पत्रकार परिषदकुरखेडा : जिल्ह्यात मागील दहा वर्षांत कधी नव्हे एवढी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र संवेदनाहीन विद्यमान राज्य सरकार कोणतीच भरीव मदत शेतकऱ्यांना करण्यासाठी तयार नाही. शेतकऱ्यांकडे सरकारचे सपशेल दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप माजी आ. आनंदराव गेडाम यांनी केला आहे. स्थानिक विश्रामगृहात २२ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. मागील वर्षी सरसरीच्या ५० टक्केपेक्षाही कमी पाऊस झाला. त्यामुळे धान पिकाचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील गावांसह संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील गावांची आणेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. शासनाने या गावांना दुष्काळग्रस्त जाहीर करून त्यांना तेथे सोयीसुविधा पुरविण्याचे आश्चासन दिले होते. मात्र आता दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही शासन कोणतीही उपाययोजना करण्यास तयार नाही. कर्जाच्या खाईमुळे शेतकरी हवालदिल व निराश झाला आहे. तीन वर्षांपूर्वी जून व जुलै २०१३ या कालावधीत विदर्भात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीबाबत २०१३ च्या पावसाळी अधिवेशनात चर्चा होऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राज्यव्यापी पॅकेज जाहीर केले होते. विद्यमान शासन मात्र उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असतांनाही कोणतीही उपाययोजना करण्याच्या मन:स्थितीत नाही. शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देत भाजपाचे सरकार निवडून आले आहे. किमान निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन शासनाने पाळावे, असे आवाहन माजी आ. गेडाम यांनी केले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, काँग्रेसचे प्रभारी जयंत हरडे, क्षेत्र प्रमुख अमोल पवार, धनराज लाकडे, रोहित ढवळे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)केवळ आश्वासनावरच सरकारचा भरराज्य व केंद्रातील सरकार विविध प्रकारचे नवनवीन आश्वासन देत जनतेची दिशाभूल करण्याचे काम मागील एक वर्षापासून सुरू केले आहे. अत्यंत आकर्षक योजनांची घोषणा सरकारच्या वतीने करण्यात येते. मात्र या योजनांची अंमलबजावणी शून्य असल्याने त्यांचे काहीच परिणाम दिसून येत नाही. राज्यभरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मात्र यावर शासन पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना करण्यास तयार नाही. केवळ काँग्रेसच्या जुन्या सरकारवर टीका करण्याचे काम विद्यमान भाजपा सरकार करीत आहे. सरकारने कृतीवर भर देण्याची मागणी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट यांनी केली.