शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
2
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
3
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
4
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
5
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
6
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
7
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
8
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
9
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
10
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
11
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
12
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
13
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
14
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
15
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
16
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
17
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
18
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
19
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
20
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...

शहरातील रस्ता दुभाजक कामातही शासकीय महसुलाचे नुकसान

By admin | Updated: July 15, 2016 01:41 IST

गडचिरोली नगर पालिकेंतर्गत वर्ष २०११-१२ मध्ये रस्ता दुभाजक (डिव्हायडर) ची कामे करण्यात आली.

लेखा परीक्षणात आक्षेप : गडचिरोली नगर पालिकेतील प्रकार गडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेंतर्गत वर्ष २०११-१२ मध्ये रस्ता दुभाजक (डिव्हायडर) ची कामे करण्यात आली. या कामांमध्ये शासनाच्या महसुलाचे नुकसान करण्यात आले. तसेच साहित्य पुरवठादाराकडून चार टक्के व्हॅट वसूल करण्यात आला नसल्याचा गंभीर प्रकार लेखा परीक्षणात उघडकीस आला आहे. शासनाला फटका देणाऱ्या या कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. इंदिरा गांधी चौक ते चामोर्शी रोड या रस्त्यावर डिव्हायडर बांधकाम करण्यात आले. सदर कामाला जिल्हाधिकाऱ्यांनी २ फेब्रुवारी २०११ ला प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर या कामाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली. दोन महिन्यात हे काम पूर्ण करायचे होते. या कामासाठी आर. एस. विष्णोई यांची निविदा इतरांमध्ये कमी दराची असल्याने ती स्विकृत करून त्यांना २४ मार्च २०११ व ३० एप्रिल २०११ ला कामाचे आदेश देण्यात आले. याबाबत २०११-१२ च्या लेखा परिक्षणात अनेक आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. सदर कामासाठी २०७९.५६ घनमीटर गौण खनिज वापरण्यात आले आहे. परंतु त्यावर गौणखनिज शुल्क मोकळे केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यात न आल्याने महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार विद्यमान दर ७०.६८ प्रती घनमीटर प्रमाणे १ लाख ४७ हजार १४ रूपये शासनाकडे जमा करण्यात आले नाही. तसेच या कामावर असणाऱ्या मजुरांचा विमा काढण्यात न आल्याने विमा संचालनालयाची १८ हजार २२७ रूपयांची हानी झाली आहे. तसेच ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार बांधकाम मुल्य १८ लाख २२ हजार ७०३ चे एक टक्का प्रमाणे १८ हजार २२७ रूपयांचा उपकरही जमा करण्यात आलेला नाही. सदर बांधकाम हे २१ लाख ५० हजार ५१० रूपयांचे आहे. मात्र करारनामा केवळ ५०० रूपयांचे मुद्रांक वापरून करण्यात आला. यामुळे शासकीय महसूलाला हानी झाल्याचे लेखा परिक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे. इंदिरा गांधी चौक ते धानोरा मार्गावरही बांधण्यात आलेल्या रस्ता दुभाजकाच्या कामाबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहे. या कामाची किमत २० लाख ९२ हजार ६३९ रूपये होती. या कामाला जिल्हाधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारी २०११ ला प्रशासकीय मंजुरी दिली होती. तर २८ जानेवारी २०११ ला तांत्रिक मंजुरी देण्यात आली. २४ मार्च २०११ ला कामाचे आदेश देण्यात आले. एक महिना मुदतीचे हे काम दिपलक्ष्मी कन्ट्रक्शन गडचिरोली यांनी घेतले. या कामात मजुरांचा विमा काढण्यात आला नाही. तसेच बांधकाम मुल्याच्या एक टक्के प्रमाणे २० हजार ९२७ रूपयांचा उपकरही जमा करण्यात आला नाही. या बांधकामाचे साहित्य खरेदी व मजुरांचे हजेरी पत्रक कनिष्ठ अभियंत्यांनी लेखा परीक्षकांसमोर सादर केले नसल्याची गंभीर बाबही पुढे आली आहे. साहित्य पुरवठादाराकडून चार टक्के व्हॅट कपातही करण्यात आला नाही. लोखंड, सिमेंट, विटा, गिट्टी, रेती व इतर बांधकाम साहित्य बांधकामापूर्वी शासकीय प्रयोगशाळेत तपासणी करून तसा अहवाल प्राप्त करणे आवश्यक होते. मात्र असा अहवाल नगर पालिकेने प्राप्त केला नसल्याचे लेखा परीक्षणात नमूद करण्यात आले आहे. एकूणच या कामातही नगर पालिका कंत्राटदारावर मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)