शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने जनतेचा केला विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:11 IST

भाजपा सरकारने निवडणूकीपूर्वी दिलेले आश्वासन चार वर्षांच्या कालावधीत अद्यापही पूर्ण केले नाही. भाजपाने सर्वसामान्यांचा विश्वासघात केला आहे. आज २६ मे रोजी केंद्रातील भाजपा सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेस जिल्हाध्यक्षांची टीका : आज काँग्रेस व मित्रपक्ष ‘विश्वासघात दिन’ पाळणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भाजपा सरकारने निवडणूकीपूर्वी दिलेले आश्वासन चार वर्षांच्या कालावधीत अद्यापही पूर्ण केले नाही. भाजपाने सर्वसामान्यांचा विश्वासघात केला आहे. आज २६ मे रोजी केंद्रातील भाजपा सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत. सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस आणि मित्रपक्ष विश्वासघात दिन पाळणार आहेत, माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी शुक्रवारी २५ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, नगरसेवक सतीश विधाते, महासचिव एजाज शेख, सोनटक्के, जितू मुनघाटे, रजनीकांत मोटघरे, सेवानिवृत्त उपमुख्याधिकारी पी.टी. मसराम, गावतुरे, तुळशीदास भोयर, दिवाकर निसार, मिलिंद बांगरे उपस्थित होते .पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी आ. डॉ. उसेंडी म्हणाले, २६ मे रोजी भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत. मोदी व फडणवीस सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकरी, सर्वसामान्यांना मोठे आश्वासन दिले होते. परंतु निवडून आल्यानंतर ही आश्वासने पूर्ण न करून जनतेची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला मागील चार वर्षांत न परवडणारा भाव दिला. त्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागले आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळात विविध मोठमोठे घोटाळे झाले आहेत. ते घोटाळे करणारे सरकारचेच लागेबांधे असल्याने ते पळून जाण्यास यशस्वी झाले, अशी टीका सुद्धा डॉ. उसेंडी यांनी पत्रकार परिषदेत केली.काँगेसच्या काळात १४८ डॉलर हा एक बॅरल कच्च्या तेलाचा भाव होता. त्यावेळी ६५ ते ७० रुपये दराने पेट्रोल मिळत होते. परंतु आज ९० डॉलर एक बॅरल असूनसुद्धा पेट्रोलच्या किमती वाढून ८४ रुपये लिटर दर झाला आहे. या किमती वाढवून सरकारने जनतेची मोठी लूट केली आहे. हे सरकार लुटारू असल्याचे उसेंडी म्हणाले. जीएसटीमुळे जिल्ह्यातील तेंदूपत्त्याचा व्यवसाय बुडाला आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ शेतकºयांपेक्षा विमा कंपन्यांनाच अधिक होत आहे. चार वर्षांपासून आदिवासी, ओबीसी व इतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेऊन अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे. सरकारच्या निषेधार्थ उद्या २६ मे रोजी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात काँग्रेस व मित्रपक्षाच्या वतीने ‘विश्वासघात दिन’ साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस कार्यकर्ते व मित्र पक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उसेंडी यांनी केले.

टॅग्स :congressकाँग्रेस