शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

शासकीय इमारतीची पुनर्बांधणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:24 IST

गडचिराेली : शहरातील अनेक शासकीय कार्यालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करणे गरजेची आहे. सदर कार्यालये जीर्ण झाल्याने बऱ्याच ठिकाणी गळती लागली ...

गडचिराेली : शहरातील अनेक शासकीय कार्यालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करणे गरजेची आहे. सदर कार्यालये जीर्ण झाल्याने बऱ्याच ठिकाणी गळती लागली आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शासकीय अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मोकळे भूखंड दुर्लक्षित

अहेरी : शहरात बहुतांश ठिकाणी शासकीय मोकळे भूखंड आहे. त्यामुळे या भुखंडावर बगीचा, क्रीडांगण साकारून शहराच्या सुंदरतेत आणखी भर टाकावी, अशी मागणी करण्यात आली असून निवेदनही देण्यात आले आहे.

कार्यालयातील तक्रारपेट्या गायब

आरमाेरी : शासकीय कार्यालयात काही वर्षांपूर्वी तक्रारपेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र बहुतांश कार्यालयातील तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत. दरम्यान, तक्रार करण्यासाठी सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मामा तलावांसाठी निधी मंजूर करा

भामरागड : तालुक्यात ५० पेक्षा जास्त मामा तलाव आहेत. पण संवर्धनासाठी जि. प. कडून तुटपुुंजी तरतूद केली जाते. तलावांवर अतिक्रमण केले. जि. प. ने निधीत वाढ करावी, अशी मागणी केली जात आहे.

पीक विम्याच्या

रकमेची प्रतीक्षा

गडचिराेली : जिल्ह्यातील शेकडो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. पण, विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. यंदाच्या पावसाळ्यात पूर आल्याने उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी विम्याची रक्कम केव्हा मिळेल, असा प्रश्न विचारला जात आहे.

तंमुसला प्रशिक्षण द्या

कुरखेडा : अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडण, तंटे वाढत आहेत. मात्र समित्या तंटे मिटविण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे तंटामुक्त समित्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. प्रशिक्षण दिल्यास भांडण व तंटे याेग्यप्रकारे साेडविण्यास मदत हाेईल.

शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी

चामाेर्शी : आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी बांधवासाठी विविध योजना राबविण्यात येतात. यंदा कोरोनामुळे योजनांसाठी निधी मिळाला नाही. त्यामुळे तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात योजनाच पोहोचल्या नाही. राज्य शासनाने निधीची तरतूद करून जिल्ह्यासाठी देण्याची मागणी आदिवासी संघटनांनी निवेदनातून केली आहे. शासकीय योजनांची अमंलबजावणी होणे गरजेचे आहे.

मास्क विक्रीतून लाभ

काेरची : कोरोनामुळे अद्यापही जनजीवन सुरळीत झाले नाही. दरम्यान, बाजारपेठ खुली झाली आहे. यामध्ये काही छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी मास्क विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला आहे.

अत्यल्प बससेवेमुळे प्रवासी त्रस्त

चामाेर्शी : मूल मार्गावर अत्यल्प बस फेऱ्या असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या मार्गावर बस सेवा वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत

देसाईगंज : जिल्ह्यातील काही गावात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरु आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविल्या जात आहे. संबंधित विभागाने अवैध वाहतुकीवर आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

बीएसएनएलतील रिक्त पदे तत्काळ भरा

गडचिराेली : जिल्ह्यातील अनेक दूरभाष केंद्रातील प्रमुख अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे. त्यामुळे येथील कारभार रामभरोसे सुरु आहे. बऱ्याच ठिकाणी अनेक तांत्रिक अडचणी आहे. यामुळे त्या सोडवण्यासाठी रिक्त पदे भरावे,अशी मागणी केली जात आहे.

गडचिरोली-मूल रेल्वे मार्ग करा

गडचिराेली : येथून गडचिरोलीसाठी नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासोबत रेल्वे मार्गाने जोडले जाईल. पर्यायाने येथील बाजारपेठेला चालना मिळेल. त्यामुळे गडचिरोली-मूल रेल्वे मार्ग होणे गरजेचे आहे.

पाणी पुरवठ्याकडे लक्ष देण्याची मागणी

धानाेरा : तालुक्यातील अनेक गावातातील जलकुंभ शोभेच्या वास्तू ठरल्या. पाणी पुरवठा योजना मंजूर असतानाही कामेच सुरू झाली नाही. याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यावर होत आहे.

मोकाट जनावरांचा चौकाचौकात ठिय्या

आष्टी : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला. ही जनावरे रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रात्रीच्या सुमारास वाहनधारकांचा अपघात होण्याचा धोका आहे. मोकाट जनावरांचा नगर परिषदेने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.

जळाऊ लाकूड उपलब्ध करून द्यावे

कुरखेडा : जंगल परिसरात असणारे ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडांचा उपयोग करतात. पण, वनकायद्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. हा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.

कार्यालयांमधील बायोमेट्रिक नावापुरतेच

गडचिराेली : शासकीय कार्यालयात बॉयोमेट्रिक मशीन बसविण्यात आली. कोरोनामुळे मशीन बंद होत्या. आता सुरू करण्यात आल्या. मात्र अनेक कार्यालयातील बॉयोमेट्रिक मशीन अजुनही बंद आहेत. परिणामी कर्मचारी वेळी-अवेळी कार्यालयात जात असल्याचे चित्र आहे.

रिक्षाचालकांना

आर्थिक त्रास

गडचिराेली : जिल्ह्यात मोठ्या संख्येने रिक्षा चालक आहे. यामाध्यमातून ते आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. मात्र कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय बंद झाला आहे. काही मोजक्याच रिक्षा चालकांना रोजगार मिळत आहे. परिणामी दिवस कसे काढावे, असा प्रश्न त्यांना पडत आहे.