शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

गोंडवाना विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

By admin | Updated: November 13, 2014 23:02 IST

गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षेला ३ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. गोंडवाना विद्यापीठांतर्गत कला, विज्ञान, वाणिज्य शाखेसह अभियांत्रिकी,

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षेला ३ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. गोंडवाना विद्यापीठांतर्गत कला, विज्ञान, वाणिज्य शाखेसह अभियांत्रिकी, कायदा शाखेतील पुनर्परीक्षार्थ्यांचीही परीक्षा सुरू झाली आहे. कला विभागातील पदवीच्या दुसऱ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ३ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. सदर परीक्षा २५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. कला विभागातील पदवीच्या चवथ्या सेमिस्टरमधील पुनर्परीक्षार्थ्यांची परीक्षा ५ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. कला पदव्युत्तर इंग्रजी विभागातील प्रथम वर्षाची परीक्षा १२ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत घेतली जात आहे. कला पदव्युत्तर इंग्रजी प्रथम वर्षाची सेमिस्टर दोनची परीक्षा ११ ते १८ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. कला पदव्युत्तर हिंदी द्वितीय सत्राची परीक्षा १२ ते १९ नोव्हेंबर, कला पदव्युत्तर हिंदी द्वितीय वर्षाच्या चवथ्या सेमिस्टरची परीक्षा ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत, पदव्युत्तर मराठी विभाग प्रथम वर्ष सेमिस्टर द्वितीयची परीक्षा १२ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. पदव्युत्तर द्वितीय वर्ष सेमिस्टर चारची परीक्षा ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत सुरू आहे. पदव्युत्तर प्रथम वर्ष पाली व प्राकृत सेमिस्टर द्वितीयची परीक्षा १२ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत तर पदव्युत्तर द्वितीय वर्ष पाली व प्राकृत सेमिस्टर चारची परीक्षा ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत घेतली जात आहे.कला शाखेतील नियमित विद्यार्थ्यांची पदवीच्या प्रथम वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरची परीक्षा २४ नोव्हेंबर २०१४ ते ६ जानेवारी २०१५ या कालावधीत तर बी.ए. द्वितीय वर्षाच्या तृतीय सेमिस्टरची परीक्षा २५ नोव्हेंबर २०१४ ते ७ जानेवारी २०१५, बी. ए. तृतीय वर्ष सेमिस्टर पाचची हिवाळी परीक्षा २६ नोव्हेंबर २०१४ ते ६ जानेवारी २०१५ या कालावधीत घेतली जाणार आहे. एम.ए. प्रथम वर्ष इंग्रजी विषयाची पहिल्या सेमिस्टरची परीक्षा २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१४ या कालावधीत एम.ए. इंग्रजी द्वितीय वर्ष सेमिस्टर तृतीय वर्षाची परीक्षा २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत एम.ए. हिंदी प्रथम वर्ष पहिल्या सेमिस्टरची परीक्षा २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर, एम.ए. हिंदी द्वितीय वर्ष सेमिस्टर तृतीयची परीक्षा २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर, एम. ए. मराठी प्रथम वर्ष सेमिस्टर एकची परीक्षा २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर, एम.ए. मराठी द्वितीय वर्ष सेमिस्टर तृतीयची परीक्षा २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत, एम.ए. पाली प्राकृत प्रथम वर्ष सेमिस्टर १ ची परीक्षा २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर, एम. ए. द्वितीय वर्ष पाली प्राकृत सेमिस्टर तृतीयची हिवाळी परीक्षा २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०१४ या कालावधीत घेतली जाणार आहे.कला शाखेव्यतिरिक्त वाणिज्य शिक्षण, गृह विज्ञान, अभियांत्रिकी, विज्ञान, सामाजिकशास्त्र, कायदा, मेडिसीन, एम. टेक आदी शाखांच्या प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ सेमिस्टरची हिवाळी परीक्षा सुरू झाली आहे. (शहर प्रतिनिधी)