गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने २0१३-१४ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ आणि महाविद्यालय यांच्या दैनंदिन कामकाजात आमुलाग्र सुधारणा घडवून आणण्याकरीता धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने माहिती व्यवस्थापन प्रणाली विद्यापीठ व महाविद्यालय पातळीवर राबविण्याचा निर्णय घेतला. सदर प्रणाली गोंडवाना विद्यापीठातही लागू करण्यात आली. विद्यापीठ व महाविद्यालयाच्या शैक्षणिक व इतर बाबीची माहिती विहित मुदतीत आणि अचुकपणे संकेतस्थळावर ऑनलाईन टाकून त्याचे व्यवस्थित व्यवस्थापन केले. त्यामुळे महाराष्ट्र शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) डॉ. प्र. रा. गायकवाड यांनी विद्यापीठाचे कौतुक केले आहे. सदर बाब विद्यापीठासाठी गौरवाची असल्याचे कुलसचिव विनायक इरपाते यांनी म्हटले आहे. या कामासाठी विद्यापीठाचे असिस्टंट प्रोग्रामर प्रमोद किसन बोरकर यांनी परिo्रम घेतले, अशी माहितीही इरपाते यांनी दिली. विद्यापीठाला चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालय संलग्न आहेत. सदर भाग आदिवासी व मागास क्षेत्रात मोडणारा आहे. संप्रेषनाच्या पाहिजे तशा सोयी उपलब्ध नाहीत. बर्याच भागात इंटरनेटची कनेक्टीव्हीटी नाही, फार कमी आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठाच्या संगणक विभागाचे सहाय्यक प्रा. प्रमोद बोरकर यांनी परिo्रमपूर्वक काम करून विद्यापीठाला हा बहुमान मिळवून दिला. राज्य शासनाने या संदर्भात पत्र पाठवून विद्यापीठाचे कौतुक केले आहे. या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून बोरकर हे काम करीत असले तरी त्यांना सहकार्य करणारे सहसंचालक नागपूर कार्यालयातील भाष्कर केवट यांचेही शासनाने कौतुक केले, अशी माहिती इरपाते यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)
गोंडवाना विद्यापीठाचे कौतुक
By admin | Updated: May 13, 2014 23:34 IST