वैरागडवासीयांची मागणी : विद्यमान चालकाकडेच स्वस्त धान्य दुकान ठेवावैरागड : येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १ मधून १४ व दुकान क्रमांक २ मधून १४० दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांमधून १५ लाभार्थ्यांची अंत्योदय योजनेसाठी निवड करायची होती. याकरिता शनिवारी वैरागड येथे विशेष ग्रामसभा बोलाविण्यात आली. मात्र सर्वच बीपीएल कार्डधारकांनी आपला अंत्योदय यादीमध्ये नाव समाविष्ट करावे, अशी मागणी केल्याने ग्रामसभेत गदारोळ निर्माण झाला.अखेर दुकान क्र. २ मधील १४० बीपीएल लाभार्थ्यांमधून ईश्वर चिठ्ठीद्वारे १५ लाभार्थ्यांची अंत्योदय योजनेसाठी निवड करण्यात आली. यावेळी ग्रामसभेत स्वस्त धान्य दुकानाचा मुद्दा चांगलाच गाजला. वैरागड येथील दोन्ही स्वस्त धान्य दुकान वैरागडातील विद्याधर आयटलवार यांच्याकडे होते. पण खोटी स्वाक्षरी करून कार्डधारकांच्या धान्याची अफरातफर केल्या प्रकरणी महसूल विभागाने आटलवार यांच्याकडून धान्य दुकानाची मालकी काढून घेतली. तेव्हापासून स्वस्त धान्य दुकान क्र. १ आरमोरीचे अनिल किरमे चालवित होते. तर दुकान क्र. २ ची मालकी सायगावच्या दादाजी माकडे यांच्याकडे होती. काही दिवसांपूर्वी मंत्रालयातून प्राप्त झालेल्या पत्रानुसार दोन्ही स्वस्त धान्य दुकान आयटलवार यांच्याकडे देण्याचे आदेश मिळाले. मात्र गावकऱ्यांनी याला विरोध केला. दुकानाची मालकी किरमे माकडे यांच्याकडे ठेवण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. (वार्ताहर)
अंत्योदय यादीवरून ग्रामसभेत गदारोळ
By admin | Updated: November 10, 2015 01:58 IST