शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

सोनेरांगीत नियमबाह्यवृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:30 IST

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून एका कंत्राटदाराने शेतकऱ्याच्या शेतातील वृक्षांची अवैध तोड केली आहे. तसेच या वृक्षांची नियमबाह्यपणे विक्री करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाची परवानगी आवश्यक : आदिवासींची झाडे असतानाही लाकडांचा लिलाव केला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून एका कंत्राटदाराने शेतकऱ्याच्या शेतातील वृक्षांची अवैध तोड केली आहे. तसेच या वृक्षांची नियमबाह्यपणे विक्री करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी येथील खिरसागर रंधये व इतर शेतकरी यांच्या वर्ग १ जमिनीवर ३५० झाडे होती. एका कंत्राटदाराने ही संपूर्ण झाडे केवळ १८ हजार रुपयांत खरेदी केली. सहायक वनरक्षक देसाईगंज आणि देलनवाडीचे वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या संगणमताने येन, बिजा व मोहफुलाच्या झाडाची अवैध वृक्षतोड केली. वर्ग १ मधील झाडे तोडायची असल्यास नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते.फळ, फुलाचे झाड तोडायचे असल्यास त्या झाडांना मागील चार वर्षांपासून फूल येत नाही व ते झाड वयस्कर झाले असेल तर त्या स्वरूपाचे नाहरकत प्रमाणपत्र कृषी अधिकाऱ्याकडून प्राप्त झाल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी फळझाडे तोडण्याची परवानगी द्यायची असते. मात्र या सर्व नियमांची पायमल्ली करून वृक्षतोड करण्यात आली आहे. सदर झाडे आदिवासींच्या खसऱ्यामधील असल्याने या झाडांची तोड वनविभागामार्फत करण्यात येऊन सदर झाडे लाकडे सरकारी डेपोत जमा करून त्याचा लिलाव करावा लागतो. लिलावानंतर मिळालेली रक्कम जमीन मालकाला द्यायची राहते. मात्र हे सर्व नियम डावलून वृक्षतोड झाली असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.३५० झाडांची केवळ १८ हजार रुपयांत विक्रीशेतकºयांच्या शेतात सुमारे ३५० झाडे होती. आजच्या बाजार किमतीनुसार या झाडांच्या लाकडांची किंमत लाखोंच्या घरात आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कंत्राटदाराने सदर लाकडे केवळ १८ हजार रुपयांत खरेदी केली. सोनेरांगी टोला येथील समाज मंदिराच्या बाजूला बिजा व येन लाकडाने दोन ट्रक भरले जात आहेत, अशी माहिती गावकºयांनी वनविभागाला दिली. वनविभागाच्या पथकाने २३ जून रोजी शनिवारी सकाळी ७ वाजता भेट दिली असता, दोन्ही ट्रक लाकडाने भरले होते. त्यांना वाहतूक परवानाही देण्यात आला होता. उर्वरित लाकडे त्याच ठिकाणी पडून आहेत. वनविभागाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग