शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यातल्या जंगलातून सोनपाखरू होताहेत दुर्मिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:18 IST

जंगलातील हिवर, किन्ह, मोवई, बोर आदी प्रजातींच्या झाडांची पाने सोनपाखरू खातात. त्यामुळे याच झाडांवर विशेषत: त्यांचे वास्तव्य असते. मात्र दिवसेंदिवस सोनपाखरू दुर्मीळ होत आहे.

ठळक मुद्देहिवर, किन्ह, मोवईच्या झाडांवर वास्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्यात जंगलातील विशिष्ट झाडांवर लालसर, गर्द निळ्या रंगाचे कीटक आढळतात. या कीटकांना झाडीपट्टीत सोनपाखरू म्हटले जाते. या सोनपाखराचे बालकांमध्ये विशेष आकर्षण असते. आकर्षक रंगामुळे हे कीटक बालके सहजरित्या हाताळतात. मात्र दिवसेंदिवस सोनपाखरू दुर्मीळ होत आहे.जंगलातील हिवर, किन्ह, मोवई, बोर आदी प्रजातींच्या झाडांची पाने सोनपाखरू खातात. त्यामुळे याच झाडांवर विशेषत: त्यांचे वास्तव्य असते. झाडाची पाने खाताना घिरट्या घालून ते लक्ष वेधतात. सोनपाखरू कीटक प्रजातीचे आहे. शास्त्रीय भाषेत त्याला इंडियन ज्वेल बिटल असे नाव आहे. झाडीपट्टीत या कीटकाला सोनपाखरू नावाने ओळखले जाते. आकर्षक रंगामुळे बालके सोनपाखरू हे कीटक आहे हे सुद्धा विसरतात. मात्र हे कीटक दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालले आहे.

हिरवीगार मऊ पाने खाद्यपहिल्या पावसानंतर ग्रामीण भागात बालके हिवर, मोवई, बोरी, किन्ह आदी प्रजातींच्या झाडावर सोनपाखरे शोधतात. याच झाडांची मऊ पाने सोनपाखरांचे खाद्य आहे. विशेषत: अनेकजण गुराख्यांना सोनपाखरू आणायला सांगतात. घरी सोनपाखरू आल्यानंतर चिमटा घालणाऱ्या त्याच्या तीक्ष्ण मानेत धागा बांधून आगपेटीत बालके कोंडून ठेवतात. मात्र याच कालावधीत सोनपाखरे अंडी घालतात. आता हा प्रसंग क्वचितच घडतो.

टॅग्स :wildlifeवन्यजीव