शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वीरमाता व वीरपत्नींचा भावपूर्ण गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST

लोकमत समुहामार्फत महिला व शहीद कुटुंबियांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यातून कुटुंबियांना धीर मिळत आहे. वीर माता व भगिनींच्या अंगी विविध गुण आहेत. त्यांचा व्यक्तीमत्व विकास होऊन आत्मविश्वास वाढण्यासाठी लोकमतचा हा सखी महोत्सव उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार डॉ. सचिन खोब्रागडे यांनी यावेळी काढले.

ठळक मुद्देसखींचा महोत्सव रंगला : शहिदांचे बलिदान महान असल्याचा मान्यवरांचा सूर, शहीद जवानांच्या शौर्याला उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकमत सखी मंच गडचिरोलीतर्फे स्थानिक आरमोरी मार्गावरील सुप्रभात मंगल कार्यालयात रविवारी सखी महोत्सव घेण्यात आला. तसेच यावेळी जिल्ह्यातील वीर माता व वीर पत्नींचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, साडी व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी होते. प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, श्री किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. सचिन खोब्रागडे, गडचिरोली ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर उद्दार, पुनम गोरे, गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे सैनिकी निदेशक सुभेदार नामदेव प्रधान, वीर माता कल्पना अमृतकर, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन, डॉ. सुषमा जैन, सखी मंचच्या संयोजिका रश्मी आखाडे आदी मान्यवर उपस्थित होते. लोकमतचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते सखी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले, समाजामध्ये आनंद वाटप केला की, ते वाढत असते. दु:ख वाटले की ते कमी होत असते. शहीद कुटुंबियांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न लोकमत समुहाकडून सुरू आहे. शहीद कुटुंबीय तसेच महिलांसाठी लोकमतने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. वीर माता व भगिनींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. शहीद पोलीस जवानांच्या पाल्यांसाठी जिल्हा व तालुकास्तरावर वसतिगृह सुरू करावे, अशी मागणी पक्षाच्या वतीने आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे, असे डॉ. उसेंडी यांनी यावेळी सांगितले.लोकमत समुहामार्फत महिला व शहीद कुटुंबियांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यातून कुटुंबियांना धीर मिळत आहे. वीर माता व भगिनींच्या अंगी विविध गुण आहेत. त्यांचा व्यक्तीमत्व विकास होऊन आत्मविश्वास वाढण्यासाठी लोकमतचा हा सखी महोत्सव उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार डॉ. सचिन खोब्रागडे यांनी यावेळी काढले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमतचे कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन, संचालन प्रिया आखाडे, शिल्पा गुंडावार यांनी केले. तर आभार वडसाच्या संयोजिका कल्पना कापसे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सहसंयोजिका सोनिया बैस, रोहिणी मेश्राम, तृप्ती अलोणे, उज्वला साखरे, स्मिता खोब्रागडे, नैना मेश्राम आदींनी सहकार्य केले.या वीर माता व पत्नींचा झाला सत्कारयाप्रसंगी सखी मंचतर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वच्छला रामभाऊ नैताम, कमला हलामी व अनिता महादेव भोयर या तीन वीर मातांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, साडी व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच मोहिनी प्रमोद भोयर, कल्पना पुरणशहा दुग्गा, नलिनी लक्ष्मण कोडाप, सविता शाहूदास मडावी, लिना किशोर बोबाटे, विनाताई कालिदास हलामी, आशाताई प्रकाश पाटील, छबीना हेमराज टेंभुर्णे, हर्षा संतोष दुर्गे, स्मिता दामोधर नैताम, संगीता विलास मांदाळे या वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला.उल्लेखनिय कार्य करणाऱ्या सखींचा सन्मानसखी मंचच्या चळवळीत उल्लेखनिय काम करणाऱ्या संयोजिका तसेच सखी सदस्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये वडसाच्या तालुका संयोजिका कल्पना कापसे, आरमोरीच्या तालुका संयोजिका सुनिता तागवान, जिल्हा सहसंयोजिका सोनिया बैस, तृप्ती अलोणे, धानोराच्या संयाजिका ज्योती उंदिरवाडे, लगामच्या संयोजिका योगीता गेडाम, सोनाली पालारपवार, प्रेमा आर्इंचवार, नवेगावच्या संयोजिका नलिनी बोरकर, अंजली वैरागडवार, नैना मेश्राम, प्रिती मेश्राम, उज्वला साखरे, मंगला बारापात्रे, अर्चना भांडारकर, पूजा भारद्वाज, रोहिनी मेश्राम आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Lokmatलोकमत