शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी युवकांना सैन्यभरतीत सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:32 IST

भारतीय लष्करासाठी जवानांची अमरावती येथे पदभरती होत असून त्यात विदर्भातील बेरोजगार युवकांना देशसेवा करण्याची चांगली संधी मिळणार आहे. त्यातही आदिवासी क्षेत्रातील युवकांना उंची आणि वजनातही सूट दिली जात आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन नोंदणी सुरू : जिल्ह्यातील सर्व बेरोजगार युवकांना देशसेवेची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय लष्करासाठी जवानांची अमरावती येथे पदभरती होत असून त्यात विदर्भातील बेरोजगार युवकांना देशसेवा करण्याची चांगली संधी मिळणार आहे. त्यातही आदिवासी क्षेत्रातील युवकांना उंची आणि वजनातही सूट दिली जात आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कॅप्टन लिमसे यांनी या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर हेसुद्धा उपस्थित होते.दरवर्षी देशाच्या लष्करात ५० ते ६० हजार सैनिक निवृत्त होतात. दरवर्षी तेवढीच पदे भरली जातात. त्यात महाराष्ट्रातील ६ ते ७ हजार जण असतात. यावेळी राज्यात ४ ठिकाणी ही पदभरती होत आहे. त्यात विदर्भासाठी अमरावती येथे भरती होत असून केवळ आॅनलाईन नोंदणी करणाऱ्यांनाच या भरतीसाठी जाता येणार आहे. येत्या ७ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर ९ आॅक्टोबरपासून वेबसाईटवरून संबंधित उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल.आठवी उत्तीर्ण असणाºया कोणत्याही युवकांना या सैन्यभरतीत सहभागी होता येणार आहे. आदिवासी युवकांसाठी १७० सेंटीमीटर उंचीऐवजी १६२ सेंटीमीटर उंची पात्र राहणार आहे. तसेच सामान्य युवकांसाठी असलेल्या किमान ५० किलो वजनाची अट आदिवासी युवकांसाठी शिथिल राहणार आहे. आदिवासी युवकांमध्ये शारीरिक क्षमता चांगली असली तरी ते लेखी परीक्षेत मागे पडतात. त्यामुळे गडचिरोलीत आणि काही ठिकाणी ग्रामीण भागातही त्यांच्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने मार्गदर्शन केले जाणार असल्याचे जि.मा.अधिकारी दैठणकर यांनी सांगितले.युवकांनी हे लक्षात ठेवावेसैन्यभरतीसाठी प्रवेशपत्रावर दिलेल्या तारखेच्या आधल्या दिवशी रात्री १ ते सकाळी ६ पर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे भरतीच्या ठिकाणी आधल्या दिवशी पोहोचणे आवश्यक आहे.प्रवेशपत्राच्या चांगल्या प्रिंटआऊट सोबत एकाचवेळी काढलेले पांढऱ्या पार्श्वभूमीवरील २० फोटो आणि मूळ शैक्षणिक कागदपत्रे, तसेच कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या तीन झेरॉक्स प्रती सोबत न्याव्या लागणार आहेत.वैद्यकीय चाचणीत नापास झालेल्या उमेदवारांना चाचणीत काही शंका वाटल्यास तिथेच अपिल करण्याची सोय आहे. त्यासाठी हेल्प डेस्क राहणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असेही कॅप्टन लिमसे यांनी सांगितले.

टॅग्स :Soldierसैनिक