शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रानभाज्यांचे विविध प्रकार बघून मान्यवर अवाक्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:16 IST

कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जांभूळ व रानभाजी महोत्सवात सुमारे २८ प्रकारच्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या. विविध प्रकारातील रानभाज्या बघून शहरातील नागरिकांसह पालकमंत्रीही अवाक् झाले.

ठळक मुद्देजांभूळ व रानभाजी महोत्सव : छोटे उद्योग स्थापन करण्याचे मार्गदर्शकांचे महिलांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जांभूळ व रानभाजी महोत्सवात सुमारे २८ प्रकारच्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या. विविध प्रकारातील रानभाज्या बघून शहरातील नागरिकांसह पालकमंत्रीही अवाक् झाले.गडचिरोलीच्या जंगलात विविध प्रकारच्या रानभाज्या आढळतात. ज्या ऋतूत जे फळ व भाजी निघते, ते त्या कालावधीत आरोग्यासाठी लाभदायी असते, असे वर्णन आयुर्वेदात आहे. रानभाज्या या कोणत्याही कीटकनाशक व रासायनिक खताविना वाढतात. तसेच रानभाज्यांसाठी कोणताही लागवड खर्च येत नाही. केवळ त्या गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागते. रानभाज्यांचे महत्त्व नागरिकांना कळावे, यासाठी कृषी विज्ञान केंद्र सोनापूर, कृषी महाविद्यालय, कृषी संशोधन केंद्र आत्मा, माविम, उमेद, वन विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीद्वारा १२ जुलै रोजी कृषी महाविद्यालयात जांभूळ व रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.महोत्सवाचे उद्घाटन वित्त, नियोजन, वनमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार अशोक नेते, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. डी. एम. मानकर, कृषी महाविद्यालयाचे डॉ. एस. डी. अमरशेट्टीवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप कराडे, डॉ. योगीता सानप आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, जांभूळ हे अल्पायुषी आहे. त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे गजरेचे आहे. जांभळात औषधी गुणधर्म असल्याने जांभूळ रस, सुपारी, जाम, जेली, लादू, चॉकलेट, आईसक्रिम असे छोटे उद्योग उभारून महिला बचत गटांनी सक्षम होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी डॉ. डी. एम. मानकर, डॉ. एस. बी. अमरशेट्टीवार, डॉ. संदीप कराडे यांनीही मार्गदर्शन केले.जांभूळ निष्कासन यंत्राचे वितरणकार्यक्रमादरम्यान वंदना महिला बचत गट गिलगाव व जिजामाता महिला शेतकरी स्वयंसहायता गट जिमलगट्टा या दोन गटांना जांभूळ बिज निष्कासन यंत्राचे वितरण करण्यात आले. बचत गटांमार्फत रानभाजी व जांभळांपासून तयार करण्यात आलेले विविध पदार्थ विक्रीकरीता ठेवण्यात आले होते. मान्यवर तसेच नागरिकांनी स्टॉलला भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारAshok Neteअशोक नेते