शहरं
Join us  
Trending Stories
1
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
2
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
3
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
4
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
5
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर
6
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
7
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
8
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
9
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 
10
हॉट मॉडेल, राजघराण्याशी संबंध, रवी शास्त्रींसोबत दिसलेली ही महिला आहे तरी कोण?
11
निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला मिळाला नवा भिडू; एकनाथ शिंदेंनी भाजपाला शह देण्यासाठी आखली रणनीती?
12
८ वर्षांत पहिल्यांदाच GST मध्ये होणार बदल! PMO नं प्रस्तावाला दिली मंजुरी; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
14
महात्मा गांधींच्या ९४ वर्षे जुन्या चित्राला लिलावात मिळाले १.७ कोटी, जाणून घ्या त्यात काय खास आहे?
15
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
16
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
17
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
18
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारची 'मिर्झापूर' सिनेमात एन्ट्री, 'या' अभिनेत्याच्या जागी दिसणार
19
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
20
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?

तेंदूपत्त्याला ३५० रूपये भाव द्या

By admin | Updated: May 18, 2015 01:47 IST

चालू तेंदूपत्ता हंगामात प्रती शेकडा ३५० रूपये भाव देण्यात यावा, अशी मागणी धानोरा तालुका विकास कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

धानोरा : चालू तेंदूपत्ता हंगामात प्रती शेकडा ३५० रूपये भाव देण्यात यावा, अशी मागणी धानोरा तालुका विकास कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या समितीच्या सदस्यांची बैठक शुक्रवारी दंतेश्वरी देवस्थानाजवळ पार पडली. यावेळी ही मागणी करण्यात आली. तेंदूपत्त्याचे पुडे घेणाऱ्या मुन्शी व शिपायाला आठ हजार मानधन, पुड्याची पलटाई करण्यासाठी जागेचा कर व पाणी कर म्हणून दोन हजार ५०० रूपये देण्यात यावा, बोदाची वाहतूक प्रती बोद ४५ रूपये प्रमाणे करण्यात यावी, तेंदूपत्ता संकलन करताना एखाद्या मजुराचा मृत्यू झाल्यास त्याला दोन लाख रूपये व अपंगत्व आल्यास एक लाख रूपये मदत देण्यात यावी, ग्रामसभा व ग्राम पंचायतीला प्रती बोद दहा रूपये देण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदाराला गावाच्या परिसरात तेंदूपत्ता संकलन करू दिले जाणार नाही, असा इशाराही दिला. बैठकीला सोडेचे सरपंच चंद्रशेखर किरंगे, समाजसेवक देवाजी तोफा, बावजी उसेंडी, माधव गोटा, बारगाये, उसेंडी, बंडू किरंगे, हनुमंत नरोटे, वासुदेव कुमोटी, जीवन नरोटे आदींसह ५० गावांमधील प्रतिनिधी व कंत्राटदार उपस्थित होते. तेंदूपत्त्याच्या माध्यमातून तेंदूपत्ता कंत्राटदार लाखो रूपये कमावून नेतात. गैरसोय मात्र गावातील नागरिकांना सहन करावी लागते. वाढीव भाव दिल्यास कंत्राटदारांना फार मोठे नुकसान सोसावे लागणार नाही. परिणामी वाढीव भाव देण्याची मागणी सभेदरम्यान करण्यात आली. सभेला पोलीस निरीक्षक ढवळेही उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)