शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांना शाेधून याेजनांचा लाभ द्या, राज्यमंत्री बच्चू कडूंचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2022 16:27 IST

मंत्री कडू यांनी शालेय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण विभागाचा आढावा घेतला

गडचिराेली : समाजात अनाथ मुले, विधवा, दिव्यांग तसेच व्हीजे-एनटीमधील गरजूंना वेगवेगळ्या प्रकारे मदतीची गरज असते. कित्येक पात्र नागरिक योजना माहीत नसल्याने वंचित राहतात. मुळात ते असहाय्य असल्याने त्यांचा शक्यतो बाहेर वावर कमी असतो. त्यांना आपण स्वत:हून त्याठिकाणी मदत करणे आवश्यक आहे. अशा सूचना राज्याचे शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत उपस्थितांना दिल्या.

मंत्री कडू यांनी शालेय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण विभागाचा आढावा घेतला. शासनाच्या अनेक योजनांमध्ये त्या महिला व बालके पात्र होतात. त्याची माहिती त्यांना देऊन योजनेत सामावून घेण्यासाठी अभियान स्तरावर कामे पूर्ण करावीत. या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा परिषदेंतर्गत येणारे विषय राज्यमंत्री यांना सादरीकरणाद्वारे सांगितले. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील व संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

महिला अर्थिक विकास महामंडळामार्फत प्रत्येक तालुक्यातून दोन तीन गटांचे उद्योग व्यवसाय वाढतील, यासाठी नियोजन करावे. यातून इतरांना पाठबळ मिळेल व आपोआपच गटांमार्फत व्यवसाय उभारणीला चालना मिळेल, असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले. व्हीजे-एनटीमधील जिल्ह्यातील एकूण नेमकी लोकसंख्या काढून त्यांना किती प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ मिळाला, याबाबत माहिती घेण्याचे संबंधित विभागाला आदेश दिले.

माेहफुलावर प्रक्रिया उद्याेग निर्मिती करा

जिल्हा राज्यात सर्वात जास्त मोह असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. बचत गटांना मोह प्रक्रियेवर उद्योग उभारणीला मोठा वाव आहे. त्याकरिता बचत गटांचा मोह या विषयाशी संबंधित संघ स्थापन करून मोहफूल उद्योग प्रक्रिया सुरू करता येईल. वन विभाग, महिला अर्थिक विकास महामंडळ व कृषी विभागाने एकत्रित येऊन मोहफुलांचे नेमके उत्पादन किती होते ? त्यासाठी काय उद्योग उभारता येईल ? व किती गट यासाठी तयार आहेत ? याची माहिती एकत्रित करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

फुलोराची केली प्रशंसा

दिभना येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत राज्याचे शालेय शिक्षण, महिला व बाल विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी भेट देवून व प्रात्यक्षिकाद्वारे विविध प्रकारचे शिक्षण देण्याचे घटक समजून घेतले. खेळत खेळत शिक्षण आत्मसात करताना त्यांनी तेथील विद्यार्थी व शिक्षकांशी गप्पा मारल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 'फुलोरा' प्रकल्प राज्यमंत्री यांना सांगितला. सोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक आर.पी. निकम शिक्षणाधिकारी प्राथमिक अरुण धामणे, शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकBacchu Kaduबच्चू कडूGadchiroliगडचिरोली