लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुस्लिम समाजाच्या विकासासाठी या समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पाठविण्यात आले आहे.मुस्लिम समाज हा दारिद्र्यात खितपत पडला आहे. विविध आयोगाने आपल्या अहवालात मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. यावर तत्कालीन राज्य सरकारने अध्यादेशामार्फत २०१४ मध्ये मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. मुस्लिम समाज संविधानिक आरक्षणाची मागणी करीत आहे. उच्च न्यायालयाने शिक्षणातील पाच टक्के आरक्षण बहाल करून सदर आरक्षण धार्मिक आधारावर नसून संविधानिक असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. मात्र मंत्रीमंडळ मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, असे वक्तव्य करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनावर मुस्ताक अब्दुल गणी शेख, नजमुद्दीन खॉ, हाजी हबीब खॉ पठाण, जहिरूद्दीन कुरेशी, मुबारकअली सय्यद, हबीब पठाण, नाशिर अली सय्यद, मजबूर खॉ पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मुस्लीम समाजाला आरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:18 IST
मुस्लिम समाजाच्या विकासासाठी या समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पाठविण्यात आले आहे.
मुस्लीम समाजाला आरक्षण द्या
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी : मुस्लीम हक्क संघर्ष समितीचे निवेदन