चामोर्शीत दिली भेट : आमदारांनी जाणल्या नागरिकांच्या समस्याचामोर्शी : येथील ढोरफोडी गाव तलाव परिसरात अनेक नागरिक कुडाची झोपडी बांधून अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. परंतु स्थानिक प्रशासनाच्या वतीने त्यांना अद्यापही गृहकर लागू न केल्याने ते सोयी- सुविधांपासून वंचित आहेत. आ. डॉ. देवराव होळी यांनी सदर नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व हक्काची जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. वादळाने उद्ध्वस्त झालेल्या ताराबाई अरके यांच्या घराची पाहणी करून त्यांना आर्थिक मदत दिली. परिसरातील संपूर्ण नागरिकांना सोयी- सुविधा देण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी तहसीलदार वैद्य, मंडळ अधिकारी सरदारे, जि. प. सदस्य रवी बोमनवार, तलाठी शेडमाके, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, रमेश शहा, दुधराम भेंडाळे, माधव गुरनुले, हरिदास सोरते, तानबा सहारे, दुर्गा मंडल, क्रिष्णा मंडल, विठ्ठल मडावी हजर होते.
गोरगरिबांना हक्काची जागा देणार
By admin | Updated: June 21, 2015 02:17 IST