शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांना हार्डशिप भत्ता द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:42 IST

आरोग्य विभागातील केवळ महिला कर्मचाऱ्यांना हार्डशिप अलाऊन्स दिला जातो. पुरूष कर्मचाऱ्यांनाही हार्डशिप अलाऊन्स मंजूर करावा, अशी मागणी महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी....

ठळक मुद्देआयुक्तांसोबत चर्चा : कामाचे तास निश्चित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आरोग्य विभागातील केवळ महिला कर्मचाऱ्यांना हार्डशिप अलाऊन्स दिला जातो. पुरूष कर्मचाऱ्यांनाही हार्डशिप अलाऊन्स मंजूर करावा, अशी मागणी महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेतर्फे आरोग्य आयुक्त डॉ. संजीवकुमार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, बायोमेट्रिक प्रणालीनुसार आरोग्य कर्मचारी एका ठराविक वेळेत थम्ब मारू शकत नाही. त्यामुळे अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना नेमक्या कोणत्या वेळेस बायोमेट्रिक थम्ब मारावी, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची वेळ निश्चित करून त्यानुसार मार्गदर्शन करावे, दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हीटीची समस्या गंभीर असल्याने सॉप्टवेअरमध्ये माहिती भरणे शक्य होत नाही. याकरिता तालुकास्तरावर यंत्रणा कार्यान्वित करावी, जिल्ह्यात ६० टक्के भाग अतिशय दुर्गम आहे. शासनाच्या बदली धोरणानुसार आरोग्य कर्मचारी हा १० वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी सेवा देत असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे काम करण्याचे मनोधैर्य खचले आहे. पोलीस विभागाच्या धर्तीवर तीन वर्षांनी अतिदुर्गम भागातील कर्मचाºयांची बदली करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा आयुक्तांसोबत चर्चा केली. शासनाच्या अन्यायकारक धोरणांमुळे दुर्गम व आदिवासी भागात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याचे मन खचले आहे. त्यामुळे या समस्या तत्काळ सोडवाव्या, अशी मागणी चर्चेदरम्यान केली. निवेदन देतेवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील मडावी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खरवडे, विनोद सोनकुसरे, अनिल मंगर, आनंद मोडक उपस्थित होते.