शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दचे पाणी कुरखेडा तालुक्यात द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:40 IST

कुरखेडा तालुक्यात सिंचनाच्या सोयी अत्यंत मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत. या तालुक्याला गोसेखुर्द तसेच इटियाडोह धरणाचे पाणी कालव्याद्वारे उपलब्धा करून द्यावे, ...

ठळक मुद्देजिल्हा बँकेत वार्षिक सभा : अरविंद पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुरखेडा तालुक्यात सिंचनाच्या सोयी अत्यंत मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत. या तालुक्याला गोसेखुर्द तसेच इटियाडोह धरणाचे पाणी कालव्याद्वारे उपलब्धा करून द्यावे, त्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे प्रतिपादन ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी केले.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३२ व्या वार्षिकर् साधारण सभेचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सभेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, माजी आ. हरीराम वरखडे, बँकेचे मानद सचिव अनंत साळवे, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारिवार उपस्थित होते.पुढे बोलताना अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, भारतातील वाढत्या लोकसंख्येचा विचार केला तर २०३० सालापर्यंत भारताची लोकसंख्या १५० कोटी होण्याची शक्यता राष्टÑ संघटनेच्या अहवालात व्यक्त केली आहे. शेतीच्या विभाजनामुळे अल्पभूधारक शेतकºयांची संख्या वाढत चालली आहे. याचा परिणाम शेतीच्या विकासावर होत आहे. भविष्यात अन्नधान्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता सुद्धा संयुक्त राष्टÑसंघटनेने व्यक्त केली आहे.कुरखेडा तालुक्यातील ९५ टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. या तालुक्यातील जमीन सुपीक आहे. मात्र या तालुक्यात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाही. निसर्गाच्या भरवशावर शेती पिकेलच याचा भरवसा नाही. विदर्भातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणून गोसेखुर्दची ओळख आहे. या प्रकल्पाचा लाभ चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याला होत आहे. या सिंचन प्रकल्पाचे पाणी गडचिरोली जिल्ह्यातही आणने शक्य आहे. इटियाडोह व गोसेखुर्द धरणाचे पाणी कुरखेडा तालुक्यात आल्यास या तालुक्यात हरीतक्रांती होईल. १५ वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय जलसंसाधन मंत्री कुरखेडा येथे कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी गोसेखुर्द व इटियाडोह धरणाचे पाणी देण्याची मागणी केली होती. आता हे खाते ना. नितीन गडकरी यांच्याकडे आले आहे. त्यामुळे त्यांची भेट घेऊन गोसेखुर्द व इटियाडोहाचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे मार्गदर्शन केले.वार्षिक साधारण सभेला बँकेचे संलग्न सभासद उपस्थित होते.