शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभांना जोडपत्र-३ ची प्रत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:23 IST

तेंदू व बांबूची विक्री करण्यासाठी ग्रामसभांकडे जोडपत्र-३ नसल्याने व्यवसाय करताना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामसभांना जोडपत्र ३ ची प्रत देण्यात यावी, ....

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कोरची तालुक्यातील महाग्रामसभांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तेंदू व बांबूची विक्री करण्यासाठी ग्रामसभांकडे जोडपत्र-३ नसल्याने व्यवसाय करताना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामसभांना जोडपत्र ३ ची प्रत देण्यात यावी, अशी मागणी कोरची तालुक्यातील महाग्रामसभेने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६ अंतर्गत ग्रामसभांना सामुहिक वनहक्क प्रदान करण्यात आले आहे. या हक्कानुसार सामूहिक वनक्षेत्रात असलेल्या वनोपजांचे संकलन, व्यवस्थापन व विक्री करण्याचे संपूर्ण अधिकार ग्रामसभांकडे देण्यात आले आहे. त्यानुसार कोरची तालुक्यातील ग्रामसभा वनांचे व्यवस्थापन करून अधिकाधिक तेंदू व बांबूचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. जंगलाचा सुक्ष्म आराखडा तयार करून तेंदू व बांबूची विक्री करण्यासाठी जोडपत्र-३ आवश्यक करण्यात आले आहे. सदर जोडपत्र ग्रामसभांकडे नसल्याने ग्रामसभांना अडचणीत आणले जात आहे. सध्या सुधारीत जोडपत्र शासनाकडेच असल्यामुळे तेंदू व्यवसाय करीत असताना पुरावा म्हणून ग्रामसभांना जोडपत्र मागू नये, किंवा शासनाने सदर जोडपत्र तत्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून केले आहे. सदर निवेदन कोरचीचे तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी शितल नैताम, झाडूराम हलामी, इजामसाय काटेंगे, हिरालाल सयाम, प्रेम तुलावी, संजू साखरे, सियाराम हलामी, कल्पना नैताम, यशवंत सहारे, राजू होळी उपस्थित होते.