शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मेडिगड्डा प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:14 IST

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : तेलंगणा सरकारकडून बांधण्यात येत असलेल्या मेडिगड्डा प्रकल्पात सिरोंचा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची शेतजमीन जात आहे. अनेक शेतकरी भूमीहीन होणार आहेत. या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा व घरांचा योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात वडधम, पोचमपल्लीतील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.गोदावरी नदीवर ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : एकरी ३५ लाख रूपये मोबदला देण्याची शेतकºयांची मागणी; राकाँ पदाधिकाºयांची चर्चा

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : तेलंगणा सरकारकडून बांधण्यात येत असलेल्या मेडिगड्डा प्रकल्पात सिरोंचा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची शेतजमीन जात आहे. अनेक शेतकरी भूमीहीन होणार आहेत. या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा व घरांचा योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात वडधम, पोचमपल्लीतील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने बॅरेज बांधण्याचे काम सुरू केले आहे. या बॅरेजमुळे वडधम, पोचमपल्ली येथील अनेक शेतकºयांची सुपीक जमीन पाण्याखाली जाणार आहे. किनाऱ्यावरील काही घरांना सुद्धा धोका निर्माण झाला आहे. जी जमीन पाण्याखाली जात आहे, त्या जमिनीचा मोबदला म्हणून तेलंगणा सरकार केवळ ९ लाख रूपये देण्यास तयार आहे. सध्याचा बाजारभाव जमिनीची सुपिकता लक्षात घेतली तर हा भाव परवडणारा नाही. त्यामुळे किमान ३५ लाख रूपये प्रती एकर एवढा भाव देण्यात यावा, त्याचबरोबर बोअरवेलचे अतिरिक्त अडीच लाख रूपये देण्यात यावे, प्रत्येक घरातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी, शासनाकडून मृत्यूपर्यंत पेंशन लागू करावी, सुपीक जमीन दुसºया ठिकाणी उपलब्ध करून द्यावी, मेडिगड्डा बॅरेजमुळे तेलंगणा राज्यालाच अधिक फायदा होणार आहे. त्यामुळे तेलंगणा सरकारने जास्तीत जास्त मोबदला द्यावा, यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावा, पोचमपल्ली, कोतापल्ली, वडधम, आयपेठा येथील नागरिकांची सभा घेऊन जमिनीचा दर निश्चित करावा, तोपर्यंत जमिनीची खरेदी-विक्री बंद करावी. पोचमपल्ली येथील गोदावरी नदीकडे जाणाºया ११२, ११३, १३८, १४३, १३५, १३७, १३६, १४३, १०२ सर्वे क्रमांकाच्या जमिनीतून शेतमालकांची परवानगी न घेताच बळजबरीने आसरअल्ली पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार प्रफुल्ल कदम यांनी नागरिकांना भीती दाखवून रोडची निर्मिती केली आहे. यासाठी ठाणेदार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.निवेदन देतेवेळी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम, जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, राकाँ जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.राज्य सरकारकडून अपेक्षामेडिगड्डा जलसिंचन प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन मात्र सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांची जाणार आहे. या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी तेलंगणा सरकारसोबत महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रतिनिधींनी चर्चा करावी, अशी मागणी केली.