शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

गरजूंना अंत्योदय योजनेचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:46 IST

तालुक्यात गरीब एपीएलधारकांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करून त्यांना अन्नधान्य व केरोसीनचा लाभ द्यावा, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : आदिवासी विद्यार्थी संघाचे तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यात गरीब एपीएलधारकांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करून त्यांना अन्नधान्य व केरोसीनचा लाभ द्यावा, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनगाम यांच्या नेतृत्वात आविसं पदाधिकाºयांनी शुक्रवारी सिरोंचाचे नायब तहसीलदार एच. एस. सय्यद व एस. एस. इंगळे यांची भेट घेऊन तालुक्यातील गरीब व गरजू एपीएल शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा लाभ मिळावा, यासाठी चर्चा केली. सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथील शेकडो एपीएल शिधापत्रिकाधारक व अन्य कुटुंब प्रमुख शुक्रवारी येथील तहसीलदार कार्यालयावर धडकले. यावेळी जि. प. महिला व बाल कल्याण समिती सभापती जनगाम यांनी नायब तहसीलदारांशी चर्चा केली. तालुक्यातील अनेक नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून अन्न-धान्य व केरोसीन मिळत नसल्याची तक्रार आपल्याकडे नागरिकांनी केली. अनेक कुटुंबाचे जीवन हलाखीचे असतानाही त्यांना अन्नधान्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे गरीब व गरजू कुटुंबांना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा. सदर लाभ मिळत नसल्याने तालुक्यातील हजारो कुटुंब धारकांना अन्न धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. निवेदन देतांना आविसं तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, सल्लागार रवी सल्लमवार, मारोती गणपुरापु, दंदेरा समय्या, आदे वेंकटेश, पोचन्ना ताडबोईना, लग्गा रमेश, मोरला समया, सुजाता कुराणा उपस्थित होते.फेरसर्वेक्षण करातालुक्यातील सर्व एपीएल शिधापत्रिका कुटुंबधारकांच्या उत्पन्नाचे सर्वेक्षण करून आसरअल्लीसह तालुक्यातील सर्व एपीएल शिधापत्रिका कुटुंब धारकांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करून त्यांना अन्न-धान्यासह केरोसीन मिळवून द्यावा, अशी मागणी मागणी सभापती जनगाम यांनी केली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी