शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
2
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
3
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
4
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
5
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
6
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
7
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
8
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
9
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
10
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
11
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
12
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
13
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
14
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
15
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
16
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
17
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
18
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
19
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
20
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!

मुलींच्या पाच शाळा बंद करण्याचा घाट,  केंद्र सरकारने माहिती मागवली

By दिलीप दहेलकर | Updated: June 1, 2024 23:52 IST

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय : निधीलाही लावली कात्री, शिक्षणाची वाट आणखी बिकट. 

गडचिराेली : नवाेदय विद्यालयाच्या धर्तीवर ग्रामीण भागातील मुलींना दर्जेदार शिक्षण, निवास एकाच ठिकाणी मिळावा, यासाठी तालुकास्तरावर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आणि वसतिगृह सुरू करण्यात आले. मात्र, आता शासनाने निधी खर्चाला कात्री लावण्याचे धाेरण अवलंबत जिल्ह्यासह राज्यभरातील सर्व ४३ केजीबीव्ही निवासी शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या सर्व शाळांची माहिती शासनाकडे सादर करण्यात आली आहे.

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बंद करायचे. मात्र, त्या शाळेतील विद्यार्थिनींना वसतिगृहात कायम ठेवत सदर मुलींना लगतच्या शाळांमध्ये दाखल करून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करायची, असा केंद्र सरकारचा डाव आहे. त्या अनुषंगानेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने तीन महिन्यांपूर्वी सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून या शाळांची सर्व माहिती मागवली, तसेच या शाळांच्या परिसरात काेणकाेणत्या शाळा आहेत, किती अंतरावर आहेत, वसतिगृहापासून तेथे जाण्यासाठी वाहतुकीची सुविधा काेणती आदींसह तत्सम माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण परिषदेकडे सादर केली. दरम्यान, ही माहिती राज्य व केंद्र सरकारकडे पाेहाेचली आहे. निधी खर्चाला कात्री लावण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर केजीबीव्ही निवासी शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.केंद्र सरकारच्या वतीने सदर शाळा व वसतिगृहाचा खर्च पूर्णत: उचलला जात आहे. तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात सन २००६ पासून सर्व मागास प्रवर्गांतील मुलींच्या शिक्षणासाठी केजीबीव्ही निवासी शाळा व वसतिगृह सुरू करण्यात आले. या शाळा दाेन प्रकारच्या आहेत. एक म्हणजे वर्ग ६ ते १०, तसेच वर्ग ९ ते १२ अशा आहेत. गडचिराेली जिल्ह्यात या दाेन्ही प्रकारच्या केजीबीव्ही शाळा आहेत. जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, सिराेंचा, एटापल्ली व धानाेरा आदी पाच ठिकाणी या शाळा आहेत. या शाळांमध्ये प्रत्येकी १०० प्रमाणे ५०० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. येथे मुख्याध्यापकासह वसतिगृह अधीक्षिका, शिक्षक, लेखापाल, स्वयंपाकी, चाैकीदार व इतर कर्मचारी निर्धारित मानधनावर कंत्राटी स्वरूपात कार्यरत आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत एमपीएसपीच्या वतीने दाेन ते तीन महिन्यांपूर्वी केजीबीव्ही निवासी शाळा व वसतिगृहाची संपूर्ण माहिती मागवली हाेती. सदर शाळेच्या परिसरात इतर काेणत्या शाळा उपलब्ध आहेत, इतर साेयी- सुविधा आदींची माहिती मागविण्यात आली हाेती. गडचिराेली जिल्ह्यातील पाचही केजीबीव्ही शाळांची सर्व माहिती शासनाकडे सादर करण्यात आली आहे.-विवेक नाकाडे, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि.प. गडचिराेली ...असे आहे कंत्राटी मनुष्यबळ आणि मानधनमहिला साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या पाच तालुकास्तरावर पाच केजीबीव्ही निवासी शाळा आणि वसतिगृहे आहेत. याठिकाणी कंत्राटी स्वरूपात मानधनतत्त्वावर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. एका शाळेला एक मुख्याध्यापक व पाच शिक्षक आहेत. मुख्याध्यापकाला मासिक ५० हजार रुपये, तर शिक्षकाला ३५ हजार रुपये मानधन दिले जाते. याशिवाय वसतिगृह अधीक्षिका, शिक्षक, लेखापाल, स्वयंपाकी, चाैकीदार व इतर कर्मचारी कार्यरत आहेत.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली