शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
4
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
5
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
6
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
7
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
8
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
9
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
10
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
11
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
12
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
14
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
15
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
16
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
17
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
18
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
19
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
20
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

प्रलंबित बुडीत मजुरी मिळणार

By admin | Updated: August 22, 2016 02:11 IST

मानव विकास कार्यक्रमांतर्गत प्रसूत झालेल्या महिलांना प्रत्येकी ४ हजार रूपये देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

९ हजार ५८ महिलांना होणार लाभ : ३ कोटी ६२ लाख ३२ हजारांचा निधी जि. प. ला प्राप्तदिलीप दहेलकर  गडचिरोलीमानव विकास कार्यक्रमांतर्गत प्रसूत झालेल्या महिलांना प्रत्येकी ४ हजार रूपये देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र सन २०१५-१६ वर्षातील महिलांसाठी सदर मजुरीची रक्कम अदा करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला वर्षभरापासून निधी मिळाला नव्हता. आता जुलै महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून ३ कोटी ६२ लाख ३२ हजार रूपयांचा निधी मिळाल्याने सदर निधी लाभार्थी महिलांना वितरित करण्यात येणार आहे. याचा लाभ ११ तालुक्यातील ९ हजार ५८ महिलांना होणार आहे.मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या जिल्ह्यातील आरमोरी, कुरखेडा, गडचिरोली, कोरची, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या ११ तालुक्यांचा मानव विकास कार्यक्रमाच्या योजनांमध्ये समावेश करण्यात आला आहे. अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील प्रसूत झालेल्या महिलांची तीन ते चार महिने मजुरी बुडते. सदर महिला प्रसूतीच्या काळात कामावर जाऊ शकत नाही. अशा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी प्रति महिलांना चार हजार रूपये बुडीत मजुरीची रक्कम देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेसाठी ११ तालुक्यातील ४२ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. सन २०१५-१६ या वर्षात ४२ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत प्रसूत झालेल्या ११ हजार ५५८ महिलांना प्रत्येकी ४ हजार रूपये प्रमाणे ४ कोटी ६२ लाख ३२ हजार रूपये बुडीत मजुरीपोेटी द्यावयाचे होते. जिल्हा प्रशासनाकडून आॅक्टोबर २०१५ मध्ये जि. प. च्या आरोग्य विभागाला एक कोटीचा निधी प्राप्त झाला. आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर प्रत्येकी ४ हजार रूपये प्रमाणे २ हजार ५०० महिलांना सदर १ कोटी रूपये वितरित केले. जिल्हा प्रशासनाकडून अत्यल्प निधी प्राप्त झाल्यामुळे ९ हजार ५८ महिला बुडीत मजुरीची रक्कम मिळण्यापासून वंचित होत्या. आता जुलै महिन्यात २०१५-१६ तील लाभार्थी महिलांसाठी ३ कोटी ६२ लाख ३२ हजार रूपये जि. प. च्या आरोग्य विभागासाठी प्राप्त झाले आहेत. सदर निधी कोषागार कार्यालयातून जि. प. च्या आरोग्य विभागाकडे वळते करण्याची कार्यवाही सुरू आहे. चालू वर्षासाठी चार कोटी मिळालेसन २०१६-१७ या आर्थिक वर्षात मानव विकास कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील प्रसूत महिलांना बुडीत मजुरीची रक्कम देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५ कोटी ८ लाख ५२ हजार रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. सदर रक्कम ४२ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत प्रसूत होणाऱ्या महिलांना वाटप करण्यात येणार आहे. चालू वर्षात महिलांना लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जि. प. च्या आरोग्य विभागाला अलिकडेच ४ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. चालू वर्षातील लाभार्थी महिलांना लवकर लाभ मिळणार आहे.महिलांच्या बँक खात्यात थेट रक्कमजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत लाभार्थी महिलांच्या बुडीत मजुरीची रक्कम संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बँक खात्यात वळते केली जाते. सदर रक्कम प्राप्त करण्यासाठी संबंधित महिलांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे. संबंधित आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी लाभार्थी महिलांच्या खात्यात बुडीत मजुरीची रक्कम वळती करतात. त्यामुळे बुडीत मजुरीची रक्कम थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केली जाते.