शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

स्पर्धा परीक्षेची तयारी करणार-गायत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

महात्मा गांधी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थापनेला ३४ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. ९६.७७ टक्के गुण प्राप्त करणारी ती आजपर्यंतच्या विद्यार्थ्यांमधील पहिली विद्यार्थिनी आहे. गायत्री ही देसाईगंज येथील राजेंद्र वार्डातील एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी आहे. वडील एफडीसीएममध्ये मानधन तत्वावर काम करतात. आई गृहिणी आहे. गायत्रीचे आई-वडील, काका, काकू, आजोबा असे संयुक्त कुटुंब आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : बारावीत ९६.७७ गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकावणाऱ्या देसाईगंज येथील महात्मा गांधी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री सुधीर सोनटक्के हिने सांगितले की, वैद्यकीय क्षेत्र निवडणे आपल्याला आवडेल. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने परिस्थितीनुसार स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी बनण्याचे आपले स्वप्न आहे. माझ्या महाविद्यालयात जे अतिरिक्त वर्ग चालत होते त्यातच माझ्या समस्येचे निराकरण होत होते. त्यामुळे आपल्याला खासगी शिकवणी लावावी, असे कधीच वाटले नाही. अभ्यासात सातत्य ठेवले. मात्र केवळ अभ्यास-अभ्यास केला नाही, अशी प्रतिक्रिया गायत्रीने लोकमतशी बोलताना दिली.आजपर्यंत सर्वाधिक गुण घेणारी विद्यार्थिनीमहात्मा गांधी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थापनेला ३४ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. ९६.७७ टक्के गुण प्राप्त करणारी ती आजपर्यंतच्या विद्यार्थ्यांमधील पहिली विद्यार्थिनी आहे. गायत्री ही देसाईगंज येथील राजेंद्र वार्डातील एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी आहे. वडील एफडीसीएममध्ये मानधन तत्वावर काम करतात. आई गृहिणी आहे. गायत्रीचे आई-वडील, काका, काकू, आजोबा असे संयुक्त कुटुंब आहे. तिने पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण आदर्श इंग्लिश हायस्कूलमध्ये घेतले. दहावीत सुध्दा तिने ९२ टक्के गुण मिळविले होते.धिरजला बनायचे आहे डॉक्टरबारावीच्या परीक्षेत ९६.३० टक्के गुण प्राप्त करून गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा धिरज भोयर हा विद्यार्थी जिल्ह्यातून द्वितीय आला. एमबीबीएस करून डॉक्टर बनण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. सैनिकी विद्यालयात शिस्त अतिशय कडक असते. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना शारीरिक कसरतही करावी लागते. त्यामुळे सैनिकी विद्यालयाचा विद्यार्थी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनतो. १९ वर्ष वय पूर्ण झाल्याने एनडीएची परीक्षा देणे शक्य नाही. त्यामुळे आपण आता वैद्यकीय क्षेत्राकडे वळणार आहे, असे धिरजने सांगितले.मार्टिनाला बनायचे आहे हृदयरोगतज्ज्ञबारावीच्या परीक्षेत ९२.७६ टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून तृतीय आलेल्या प्लॅटिनम ज्युबिली स्कूल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी मार्टिना हेमानी हिला हृदयरोगतज्ज्ञ बनायचे आहे. शाळेतील पाच सराव परीक्षांमुळे आणि शिक्षकांकडून वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आपण एवढे गुण प्राप्त करू शकलो, असे तिने सांगितले. विशेष म्हणजे मार्टिना हिने दहावीचे शिक्षण प्लॅटिनम ज्युबिली अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेजमधून पूर्ण केले. त्यावेळी ती जिल्ह्यातून प्रथम आली होती. यावेळीही जिल्ह्यातून प्रथम येण्याचे तिचे स्वप्न प्रकृतीच्या कारणामुळे पूर्ण होऊ शकले नाही. 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल