शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गॅस दरवाढीने तीन लाख कुटुंबांचे जेवण महाग, अडीच कोटी वीजग्राहकांना दरवाढीचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:23 IST

नवीन आर्थिक वर्षात महागाईचा दुहेरी फटका: गृहिणींचे किचन बजेट कोलमडले, सर्वसामान्यांना झळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र शासनाने गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे स्वयंपाक महागला आहे. याचा फटका जिल्ह्यातील तीन लाख कुटुंबांना बसणार आहे. तसेच १ एप्रिलपासून विजेचे दर प्रति युनिट ६० पैशांनी वाढवत असल्याचेही परिपत्रक महावितरणने काढले आहे. याची झळ अडीच लाख वीज ग्राहकांना सोसावी लागेल. या दोन निर्णयांमुळे नवीन आर्थिक वर्षात सामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे.

अपवाद वगळता प्रत्येक कुटुंबाकडे गॅस सिलिंडर आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील काही कुटुंबे चुलीवर स्वयंपाक करतात. मात्र, शहरी भागातील नागरिकांना गॅसवर स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय राहत नाही.

गॅससाठी आता मोजा ९०९ रुपये

  • गडचिरोली शहरात गॅस सिलिंडर ८५९ रुपयांना उपलब्ध होत होते. शासनाने त्यात ५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सिलिंडरसाठी ग्राहकांना आता ९०९ रुपये मोजावे लागणार आहेत.
  • उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत ६० हजार कुटुंबांना गॅसचे वितरण करण्यात आले आहे. या कुटुंबांना ५०० रुपयांत गॅस सिलिंडर मिळत होता. आता त्यासाठी ५५० रुपये मोजावे लागणार आहेत. उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी गरीब आहेत. रिकामे सिलिंडर घरी ठेवून ते चुलीवर स्वयंपाक करीत होते. आता पुन्हा गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे.

वापर वाढला, दरही वाढलेएप्रिल महिन्यापासून उकाडा वाढला असल्याने विजेचा वापर वाढला आहे. महावितरणने दर वाढविल्याने अधिकचे बिल ग्राहकांना मोजावे लागणार आहे. महावितरणने दरवाढ केली. मग चांगली सेवा देणार काय? असा प्रश्न आहे. 

"शहरात गॅसशिवाय स्वयंपाक शक्य नाही. त्यामुळे गॅस ही शहरी भागातील कुटुंबांची गरज आहे. गॅसच्या किमतीत वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम कुटुंबाच्या बजेटवर होतो. शासनाने गॅसच्या किमती वाढवू नये, अशी अपेक्षा आहे."- भूमिका वासेकर, गृहिणी, आरमोरी

"चैनीच्या वस्तूंवर विविध प्रकारचे कर लादून त्यातून शासन कर गोळा करू शकते. गॅस ही अत्यावश्यक गरजांमध्ये मोडते. त्यामुळे गॅसच्या किमती वाढणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे."- सपना धोटे, गृहिणी, पालोरा

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरGadchiroliगडचिरोली