शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

चामोर्शीतील दिना धरणाच्या कालव्यात टाकला जाताहे कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:22 IST

घोट परिसरातील रेगडी येथील दिना धरणाचा कालवा चामोर्शी तालुक्याच्या सिंचन सुविधेसाठी शहरालगत आणण्यात आला आहे. या दिना धरणाच्या कालव्यात चामोर्शी शहरातील नागरिक टाकाऊ कचरा फेकत आहेत. परिणामी सदर कालव्याचा परिसराला डम्पिंग यार्डचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना ठरणार डोकेदुखी : प्रशासनाकडून जनजागृतीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : घोट परिसरातील रेगडी येथील दिना धरणाचा कालवा चामोर्शी तालुक्याच्या सिंचन सुविधेसाठी शहरालगत आणण्यात आला आहे. या दिना धरणाच्या कालव्यात चामोर्शी शहरातील नागरिक टाकाऊ कचरा फेकत आहेत. परिणामी सदर कालव्याचा परिसराला डम्पिंग यार्डचे स्वरूप प्राप्त झाले आहे.आष्टी मार्गालगत जाणाºया दिना धरणाच्या नहरात टाकाऊ कचरा फेकला जात असल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांची डोकेदुखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात प्रशासनाने जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.दिना धरणाच्या नहरात आजुबाजूला असलेली नागरिक व व्यावसायिक दैनंदिन केरकचऱ्याची साफसफाई झाल्यानंतर नहरात हा कचरा टाकत आहेत. यामध्ये प्लॉस्टिकचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने शेतकºयांसाठी हा कचरा डोकेदुखी ठरणार आहे.यावर्षी दिना नहरातील गाळाचा उपसा करून पाणी वाहून जाण्याची दिशा व्यवस्थित करण्यात आली. मात्र दिवसेंदिवस नहरात कचऱ्याचे ढिग दिसून येत असल्याने प्रशासकीय यंत्रणा सुस्त आहे. दिना धरणाच्या नहरातून पाणी आल्यानंतर संपूर्ण कचरा वाहून जाऊन शेतात जमा होऊ शकतो. त्यामुळे शेतकºयांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भविष्यात निर्माण होणारी समस्या लक्षात घेऊन संंबंधित विभागाने सदर कचरा टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. सुका व प्लास्टिकयुक्त कचरा जाळून तो नष्ट करण्याची गरज आहे. मात्र याबाबत प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता दिसून येत आहे.चामोर्शीत प्लास्टिकबंदी नाममात्रचपर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या उद्देशाने शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. याची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आले. दरम्यान प्रशासनाच्या वतीने चामोर्शी शहर व तालुक्याच्या काही ठिकाणी प्लास्टिक जप्तीची मोहीम काही महिन्यापूर्वी राबविण्यात आली. मात्र अल्पावधीतच ही मोहिम बंद पडली. परिणामी चामोर्शी शहरात प्लास्टिक वापराचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे पानठेल्यावरील खर्रा पन्नीत मिळत असल्याने अनेक ठिकाणी पन्न्यांचे ढिग दिसून येत आहेत.