शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

पुजाऱ्याच्या गावठी उपचारामुळेच गणेशचा मृत्यू; रूग्णालयात उपचारच घेतला नाही!

By दिलीप दहेलकर | Updated: July 25, 2023 20:54 IST

गणेश तेलामी याने तब्बल तीन महिने पुजाऱ्यांकडून गावठी उपचार घेतला. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले.

गडचिरोली : भामरागड तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील कृष्णार येथील गणेश लालसू तेलामी या २३ वर्षीय अविवाहित युवकाचा क्षयरोगाने मृत्यू होऊन त्याला रूग्णवाहिका न मिळाल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. दुसऱ्या दिवशी जिल्हा व तालुकास्तरावरील चमूने थेट कृष्णार गाव गाठून सदर मृत्यू प्रकरणाबाबतची सत्य परिस्थिती जाणून घेतली असता विदारक वास्तव उजेडात आले. 

गणेश तेलामी याने तब्बल तीन महिने पुजाऱ्यांकडून गावठी उपचार घेतला. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. येथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. अहेरी उपविभागाच्या दुर्गम भागात अजुनही आदिवासी समाजामध्ये अंधश्रद्धा व अज्ञान आहे. तालुकास्तर व मोठ्या गावापर्यंत शासकीय आरोग्य सेवा पोहोचली असली तरी या भागातील अनेक लोक अज्ञानामुळे रूग्णालयात जाऊन औषधोपचार करीत नाही. असाच प्रकार गणेश तेलामी याच्याबाबत घडला. 

तीन महिन्याआधीपासून गणेशची प्रकृती बिघडली. दरम्यान, तो स्वत: किंवा कुटुंबियांनी शासकीय व कोणत्याही खासगी रूग्णालयात जाऊन औषधोपचार घेतला नाही. गावठी उपचारावर पूर्णत: निर्भर राहिला. अहेरी- भामरागड दरम्यान असलेल्या बांडियानगर येथे पुजाऱ्याकडे जाऊन तब्बल तीन महिने गणेशने गावठी उपचार घेतला. परिणामी प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडली. पोटदुखी, अतिसार, ताप आदी त्रास होऊ लागला. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर त्याला कुटुंबियांनी हेमलकसाच्या लोकबिरादरी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. येथे गणेशला १७ जुलैला भरती करण्यात आले. १९ जुलैला तो क्षयरोग पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. उपचारादरम्यान त्याचा २० जुलैला मृत्यू झाला.

पोलिसांच्या मदतीने दिली शववाहिकागंभीर रूग्णांना ने-आण करण्यासाठी शासकीय व खासगी रूग्णालयामार्फत रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते. मात्र मृतदेहाला नेण्यासाठी रूग्णवाहिका दिली जात नाही. त्यासाठी शववाहिका देण्याची तरतूद आहे. लोकबिरादरी दवाखान्यातून दुचाकीवर खाट बांधून त्यावर मृतदेह आणताना तेलामी कुटुंबिय पोलिसांना दिसले. दवाखान्यापासून एक किमी अंतरावर आल्यावर भामरागड पोलिसांनी त्यांना अडविले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांना माहिती देताच ते त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे संपर्क साधून शववाहिका बोलाविली व त्यातून मृतदेह पाठवला, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

या कारणामुळे झाला मृत्यूगणेशला ताप होता. वजन व रक्त फार कमी होते. रक्त केवळ ७.८ ग्रॅम होते. त्याला रक्ताची गरज होती. त्याला पोटदुखी, अतिसाराचा त्रास होता. मात्र पुजाऱ्याकडे उपचार करण्यात वेळ दवळल्याने त्याला प्राणाला मुकावे लागले. याच कारणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. कधी आंध्रप्रदेश, कधी पेरमिली आदी ठिकाणी राहून तो काम करायचा. त्यामुळे तो आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला नाही.

गणेशने पुजाऱ्यांकडून गावठी उपचार घेतला. प्रकृती गंभीर झाल्यावर त्याला लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात दाखल केले, अशी माहिती मृतक गणेशचा लहान भाऊ दिलीप लालसू तेलामी यांच्याकडून मिळाली. गणेशची प्रकृती बिघडल्याबाबतची थोडीशीही माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांना नव्हती. आज घरी भेट देऊन चौकशी केल्यावर हा प्रकार समोर आला.- डॉ. भूषण चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी, भामरागड 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली