गडचिरोली : गडचिरोली येथील मुख्य डाकघरात शुक्रवारी सकाळी नव्या २००० व ५०० च्या नोटा १२ वाजेपर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या व त्या नोटा त्यांच्याकडे उपलब्ध होईल किंवा नाही, याचीही शाश्वती नसल्याने डाक कार्यालयात केवळ जुन्या नोटा ग्राहकांकडून स्वीकारण्याचे काम करण्यात आले. अनेक नागरिक सुकन्या योजनेंतर्गत रक्कमेचा भरणा करण्यासाठी पोस्ट कार्यालयात आले होते. मात्र हे काम आता करता येणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. बऱ्याच ग्राहकांनी येथे आवर्त ठेवीच्या खात्यावर जुन्या नोटांच्या आधारावर भरणा केला. त्यामुळे पोस्टातही ग्राहकांची चांगली गर्दी दिवसभर दिसून आली. (जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोलीच्या पोस्टात नव्या चलनाचा तुटवडाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2016 02:14 IST