शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठातील १३० महाविद्यालये प्राचार्यांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 13:02 IST

दिलीप दहेलकर ।आॅनलाईन लोकमतगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यातील २०८ महाविद्यालयांपैकी १३० महाविद्यालयांमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नियमित प्राचार्य नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांच्या व्यवस्थापन व गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यात एकूण २३८ महाविद्यालये होती. त्यापैकी विनाअनुदान ...

ठळक मुद्देप्राध्यापकांचीही वानवापदमान्यतेअभावी भरती प्रक्रिया थंडबस्त्यात

दिलीप दहेलकर ।आॅनलाईन लोकमतगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यातील २०८ महाविद्यालयांपैकी १३० महाविद्यालयांमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नियमित प्राचार्य नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांच्या व्यवस्थापन व गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यात एकूण २३८ महाविद्यालये होती. त्यापैकी विनाअनुदान तत्वावरील नाममात्र सुरू असलेल्या ३० महाविद्यालयांची मान्यता विद्यापीठ प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच काढली आहे. उर्वरित २०८ महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमात पदवी, पदव्यूत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. महाविद्यालयाचे प्रशासन योग्यरीत्या व नियमानुसार चालण्यासाठी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी व गुणवत्ता टिकविण्यासाठी सर्व महाविद्यालयात नियमित प्राचार्य असणे गरजेचे आहे.महाविद्यालयात विषयनिहाय प्राध्यापक व शाखानिहाय विभाग प्रमुख असणे शासन निर्णयानुसार आवश्यक आहे. मात्र या दोन्ही जिल्ह्यातील १३० महाविद्यालयांत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नियमित प्राचार्य नाही. अशा महाविद्यालयाचा कारभार कार्यकारी तसेच प्रभारी प्राचार्याच्या भरवशावर सुरू आहे.या महाविद्यालयांमध्ये सद्य:स्थितीत १ हजार २८ प्राध्यापक कार्यरत आहेत. अनेक महाविद्यालयांत प्राध्यापकांची जवळपास ३०० वर पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.नियमित प्राचार्य व प्राध्यापकांची पदभरती करण्याबाबत गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने संबंधित महाविद्यालयांना दोन ते तीन वेळा नोटीस बजावली आहे. त्यानंतर नियमित प्राचार्य व प्राध्यापक भरण्याबाबत काही अनुदानित महाविद्यालयांनी हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती आहे.पदमान्यतेअभावी भरती प्रक्रिया थंडबस्त्यातपदभरती करण्याबाबत गोंडवाना विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना नोटीस बजावून सूचित केले होते. त्यानंतर काही अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांनी प्राचार्य व प्राध्यापक पदभरतीची प्रक्रिया हाती घेतली होती. मात्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सहसंचालकांकडून पद मान्यता देणे बंद केले आहे. नव्याने नियमित प्राचार्य व प्राध्यापकांना मान्यता मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यात प्राचार्य व प्राध्यापकांची भरती प्रक्रिया थंडबस्त्यात आहे.

टॅग्स :educationशैक्षणिक