शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
2
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
3
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
4
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
5
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
6
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
7
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
8
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
9
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
10
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
11
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
12
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
13
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
14
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
15
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
16
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
17
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
18
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
19
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
20
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा

गडचिरोलीच्या मत्स्य पालनाला येणार ‘अच्छे दिन’

By admin | Updated: August 7, 2016 01:43 IST

पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ५०० वर मामा मालगुजारी तलाव आहेत. या तलावात मासेमारी

डीपीसीत ठराव : मत्स्य विज्ञान उपकेंद्र स्थापन करणार गडचिरोली : पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ५०० वर मामा मालगुजारी तलाव आहेत. या तलावात मासेमारी हा पारंपारिक व्यवसाय अनेक लोक करतात. या मासेमारी व्यवसायाला आता ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. गडचिरोली जिल्हा नियोजन व विकास समितीने गडचिरोली येथे मत्स्य विज्ञान उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. गडचिरोली हा देशातील मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात रोजगाराच्या कोणत्याही संधी नाही. त्यामुळे उपलब्ध साधन- संसाधणाच्या आधारावर नागरिक आपली उपजिविका करीत असतात. गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ५०० मामा मालगुजारी तलाव आहेत. यातील काही तलाव हे जिल्हा परिषदेच्या तर काही लघू पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येतात. राज्य सरकारने गेल्या दोन- तीन वर्षांत मामा मालगुजारी तलावांच्या पुनर्जीवनासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे या तलावात स्थानिक मच्छीमार सहकारी संस्था व आता पेसा कायद्याची अंमलबजावणी झाल्यामुळे ग्राम पंचायती या तलावाच्या माध्यमातून मासेमारी व्यवसायाला प्रोत्साहन देत आहेत. जिल्ह्यात ४ हजार ८५० जलसाठे, मामा तलाव व पाटबंधारे तलावांच्या स्वरूपात आहे. या शिवाय जलयुक्त शिवार व मागेल त्याला शेततळे यामुळे तलावाची संख्या वाढणार आहे. या तलावांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्याचा उद्देश समोर ठेवून गडचिरोली जिल्हा नियोजन समितीने गडचिरोली जिल्ह्यात मत्स्य विज्ञान उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. अभ्यास व संशोधन या अनुषंगाने मासेमारी काम करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या उपक्रमात गोंडवाना विद्यापीठालाही सहभागी करून घेतले जाणार आहे. लवकरच हे मत्स्य विज्ञान उपकेंद्र गडचिरोलीत स्थापन होईल, या दृष्टीने प्रशासनाला काम करण्याची सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी) मत्स्य पालनातून २२ कोटीची मिळकत २१०० सिंचन तलाव असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ८ हजार ६६६ हेक्टर क्षेत्र मत्स्य व्यवसायासाठी कामी येणारे आहे. त्यापैकी ५ हजार ३६९ हेक्टरवर मत्स्य व्यवसाय करण्यात आला. यातून ११०७४० टन मत्स्य उत्पादन झाले. २२३४ लाखांचे उत्पन्न या मत्स्य व्यवसायातून जिल्ह्यातील संस्थांना मिळाले आहे. जिल्ह्यात ९६ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था असून ११ हजार ३२९ सभासद या संस्थेशी जुळलेले आहेत.