शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदानासाठी उत्स्फूर्तपणे सरसावले गडचिरोलीकर युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : लोकमतचे संस्थापक संपादक आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ...

ठळक मुद्देजवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीचे निमित्त : जीवनदान देण्यासाठी प्रत्येक हाकेला धावून येण्याचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकमतचे संस्थापक संपादक आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात गडचिरोलीकर युवकांसह विविध कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेतला. दुसºयाला जीवनदान देणाºया या रक्तदानाच्या पवित्र कार्यासाठी आपण सदैव तयार असून प्रत्येक हाकेला धावून येणाचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत आयोजित या शिबिराची सुरूवात बाबुजींच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी हसनअली गिलानी, सामाजिक कार्यकर्ते विनायक बोरकर, ओबीसी महासंघाचे रुचित वांढरे, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.शैलजा मैदमवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.सकाळी १०.३० वाजता सुरू झालेले रक्तदान दुपारी ३ पर्यंत सुरू होते. कोरोनाच्या सावटात सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापर करण्याची खबरदारी घेतली जात होती. सर्व दात्यांना लगेच डोनर कार्ड आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.या शिबिरासाठी लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ.गणेश जैन, जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, सखी मंचच्या संयोजिका रश्मी आखाडे, सोनिया बैस, नलिनी बोरकर, लोकमतचे दिगांबर जवादे, गोपाल लाजुरकर, श्रीरंग कस्तुरे, विकास चौधरी, निलेश धाईत तथा रक्तपेढीचे तंत्रज्ञ सतीश तडकलावार आदींनी सहकार्य केले.२४ वेळा केले रक्तदानलोकमतने रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची बातमी वाचून येथील शासकीय तंत्रनिकेतनचे कर्मचारी रोशन गुलाबराव वाघमारे रक्तदान करण्यासाठी आले. त्यांचे हे २४ वे रक्तदान असल्याचे समजताच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यापूर्वी ठाणे व इतर ठिकाणी असताना त्यांनी वेळोवेळी रक्तदान केले आहे.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाBlood Bankरक्तपेढी