शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले गडचिरोलीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 01:12 IST

केरळ राज्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळे केरळवासीयांवर मोठे संकट कोसळले आहे. मनुष्य व वित्तहानी झाली असून तेथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी गडचिरोलीकरांनी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देशहरात राबविली निधी संकलन मोहीम : केरळ पूरग्रस्त सहाय्यता निधी समितीचा पुढाकार; शहरातील विविध संघटनांचे सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केरळ राज्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळे केरळवासीयांवर मोठे संकट कोसळले आहे. मनुष्य व वित्तहानी झाली असून तेथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी गडचिरोलीकरांनी पुढाकार घेतला आहे. रविवारपासून शहरात सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने निधी संकलन मोहीम हाती घेण्यात आली आहे. रविवारी अनेक कार्यकर्त्यांनी शहरातील बाजारपेठेत फिरून मदतीसाठी निधी संकलीत केला.केरळ पुरग्रस्त सहायता निधी समिती गडचिरोलीच्या वतीने रविवारी दुपारी १ वाजता स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहातून निधी संकलन मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आ. डॉ. देवराव होळी, राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे घिसुलाल काबरा, प्रा. शेषराव येलेकर, देवानंद कामडी, न. पं. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, डॉ. भारत खटी, प्रकाश अर्जुनवार, प्राचार्य राजेश चंदनपाट, रमेश भुरसे, वासुदेव बट्टे, नगरसेवक केशव निंबोड, स्मिता लडके, सुधा सेता, राजनहिरे, साळवे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.इंदिरा गांधी चौक ते चंद्रपूर रोडवरील बाजारपेठ, गांधी वॉर्ड, सराफा लाईन, बाजार चौक ते कारगिल चौक, चामोर्शी मार्गावरील बाजारपेठ, आरमोरी मार्गावरील श्री मंगल कार्यालयापासून पेट्रोलपंपापर्यंत, गांधी चौक ते धानोरा मार्गावरील बसस्थानक ते लांझेडा आदी भागात फिरून कार्यकर्त्यांनी केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदत निधी संकलित केला. यावेळी अनेक व्यावसायिक, नागरिकांनी केरळवासीयांसाठी निधी दिला. दुपारी १ वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत सदर निधी संकलन मोहीम सुरू होती. मदतपेटी घेऊन कार्यकर्ते फिरत होते.दिवसभरात ६५ हजारांचा निधी जमाकेरळ पूरग्रस्त सहायता निधी समितीच्या वतीने गडचिरोली शहरात निधी संकलन मोहीम सुरू करण्यात आली असुन रविवारी दिवसभरात एकुण ६५ हजार रूपयांचा निधी जमा करण्यात आला. सोमवारी ही मोहिम जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयापासून कॉम्प्लेक्स परिसरात राबविण्यात येणार आहे. तसेच नगर पालिका व इतर शासकीय कार्यालय परिसरातून निधीचे संकलन करण्यात येणार आहे. चार दिवस संकलित झालेला निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे. शहरातील सर्वच स्तरातील नागरिक पूरग्रस्ताच्या मदतीसाठी सरसावले आहेत.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरGadchiroliगडचिरोली