शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत हिंसक घटनांनी निवडणुकीला गालबोट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 06:05 IST

७० टक्के मतदान : तीन पोलीस जखमी; अनेक ठिकाणी मतदान केंद्रे बदलली

गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम आणि नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल भागात हिंसक घटनांमुळे मतदान प्रक्रियेत अडथळे आले. यात तीन पोलीस जवान जखमी झाले. गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७० टक्केपेक्षा जास्त मतदान झाले आहे.

एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी गावच्या शाळेजवळ नक्षलवाद्यांनी सकाळी ११ च्या सुमारास भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. गेल्या निवडणुकीपर्यंत त्या शाळेत मतदान केंद्र होते. परंतु घातपाती कारवायांची शक्यता पाहून या वेळी मतदान केंद्र अंगणवाडी केंद्रात ठेवल्याने त्या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या स्फोटानंतरही गावात मतदान सुरळीत सुरू होते.

दुसऱ्या घटनेत कोरसलगोंदी या मतदार केंद्रावरील कर्मचारी आणि पोलीस मतदान प्रक्रिया पूर्ण करून ३.१५ वाजता हेडरी येथील बेस कॅम्पवर येण्यासाठी पायी निघाले असता गावाजवळच भूसुरुंगाचा स्फोट झाला. त्यात एक जवान जखमी झाला.मतदानाच्या आदल्या दिवशी बुधवारी एटापल्ली तालुक्यातच गट्टा (जांभिया) येथे मतदान केंद्राकडे जात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बससमोरील पोलीस कर्मचाºयांना लक्ष्य करून भूसुरूंग स्फोट घडविला होता. त्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.

गडचिरोलीतील सर्व केंद्रांवर दुपारी ३ पर्यंतच मतदानाची वेळ असल्यामुळे सकाळी ७ वाजतापासून नागरिकांनी मतदानासाठी गर्दी करणे सुरू केले होते. शहरातील काही केंद्रांवर मतदानाची वेळ संपली तरी गर्दी कमी झालेली नव्हती.एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथे नक्षल दहशतीला न जुमानता दुपारच्या भर उन्हात जंगलालगतच्या एका घरात ठेवलेल्या मतदान केंद्रावर नागरिकांची अशी रांग लागली होतीमतदारांचा ट्रॅक्टर उलटला; तीन महिला ठारडोंगरमेंढा गावातील नागरिक मतदान करण्यासाठी ट्रॅक्टरने जात असताना ट्रॉली उलटल्याने तीन महिला मतदार ठार झाल्या. याशिवाय ४ जण गंभीर तर १७ किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी १.३० वाजता घडली. यमुना मुरारी मलगाम (६०), हिराबाई मनिराम राऊत (७०), रसिका ईश्वर मरसकोल्हे (६०) अशी मृतांची नावे आहेत.

टॅग्स :gadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूर