शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

"देव तारी त्याला कोण मारी" चा आला गडचिरोलीत प्रत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 20:48 IST

चंद्रपूरच्या जिल्ह्याच्या नागभिडवरून चामोर्शीमार्गे अहेरीला जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनखोडा गावानजीक नाल्यात कार कोसळली. मात्र सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

ठळक मुद्देकार नाल्यात कोसळली, दोघे बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चंद्रपूरच्या जिल्ह्याच्या नागभिडवरून चामोर्शीमार्गे अहेरीला जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनखोडा गावानजीक नाल्यात कार कोसळली. मात्र सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. १० फूट पाणी असलेल्या नाल्यात पडूनही जीवितहानी न झाल्याने फुलझेले कुटुंबियांना ‘देव तारी त्याला कोण मारी’ याचा प्रत्यय आला.

नागभिड येथील रहिवासी दादाजी कारूजी फुलझेले हे पत्नी शेवंताबाईला घेऊन एमएच ४९ एई २३३८ क्रमांकाच्या कारने चामोर्शी मार्गे अहेरीकडे जात होते. मुलगी व जावयांना भेटायला कारने जात असताना अनखोडा गावानजीकच्या नाल्याजवळ त्यांना भ्रमणध्वनी आला. भ्रमणध्वनीला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करताना वाहनावरील नियंत्रण सुटले.परिणामी कार रस्त्याच्या खाली उतरून सरळ नाल्यात गेली. यावेळी नाल्यात १० फूट पाणी होते. कार चालकाच्या बाजूचा अर्धा काच खुला असल्याने कार चालक व मालक दादाजी फुलझेले स्वत: कारच्या बाहेर निघून आपल्या सोबत असलेल्या पत्नीला पाण्याखाली सापडलेल्या कारमधून बाहेर काढले. स्वत:चे व पत्नीचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले. नशिब बलवत्तर असल्याने एवढा मोठा अपघात होऊनही पती-पत्नी सुखरूप बचावले. नागरिकांच्या मदतीने पत्नीला आष्टी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले. दुपारी १२ वाजता क्रेन बोलवून अपघातग्रस्त कार नाल्यातून बाहेर काढले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरिक्षक धर्मेंद्र मडावी, पोलीस उपनिरिक्षक जयदीप पाटील, ए. एस. गोंगले, पोलीस हवालदार रामटेके, शिपाई राजू पंचपुलीवार, बालाजी येलकुचीवार आदी करीत आहेत. शेवंताबाई फुलझेले यांच्या कंबरेला मार लागला असल्याने त्याने चंद्रपूरच्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघात