शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला 25 वर्षांचा तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 20:30 IST

गडचिरोलीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निकाल

गडचिरोली : स्वत:च्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला गडचिरोलीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने २५ वर्ष सश्रम कारावास आणि २५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. देसाईगंजमध्ये राहणाऱ्या नराधम पित्यानं घरी कुणी नसल्याची संधी साधून स्वत:च्या मुलीवर बळजबरीने बलात्कार केला. या प्रकरणातील आरोपी बापास गडचिरोलीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र शर्मा यांनी शिक्षा सुनावली. १२ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी ३.३० वाजता पीडित मुलीची आई ही आठवडी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेली होती. यावेळी वडिलाने आपल्या मुलाला पेट्रोल घेण्यास बाहेर पाठवले. यावेळी पीडित मुलगी घरातील भांडे घासत होती. आरोपी बापाने तिचा हात धरून तिला बाथरूममध्ये नेले. त्यानंतर बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने ही सर्व हकीकत बाजारातून घरी आलेल्या आपल्या आईला सांगितली. पीडित मुलगी व आईने लागलीच देसाईगंज पोलीस ठाणे गाठून आरोपी बापाविरूद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम ३७६, ३७७ व बाल लैंगिक अत्याचार कायद्याचे कलम ६ अन्वये गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. साक्षीदारांची जबानी व वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र शर्मा यांनी आरोपी बापास ३७६ कलमान्वये १० वर्षांचा सश्रम कारावास, १० हजार रूपये दंड, कलम ३७७ अन्वये पाच वर्षांचा सश्रम कारावास, पाच हजार रूपये दंड, तसेच बाल लैंगिक अत्याचार कायद्याच्या कलमान्वये १० वर्षांचा सश्रम कारवास व १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अनिल प्रधान यांनी काम पाहिले. 

टॅग्स :Rapeबलात्कारGadchiroliगडचिरोली