शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत गोरगरिबांच्या तांदळाची विक्री करण्याचा डाव उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 10:57 IST

गोरगरिबांना वाटण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केलेला शासकीय तांदूळ खासगी व्यापाऱ्याला परस्पर विकण्याचा डाव स्थानिक पोलिसांनी उधळून लावला.

ठळक मुद्दे३० चुंगड्या जप्त देसाईगंज येथे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोरगरिबांना वाटण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केलेला शासकीय तांदूळ खासगी व्यापाऱ्याला परस्पर विकण्याचा डाव स्थानिक पोलिसांनी उधळून लावला. यात ४४ हजार ५५० रुपयांचा ३० चुंगड्या तांदूळ (१४.८५ किलो) आणि मालवाहू वाहन असा एकूण ७ लाख ४४ हजार ५५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी देसाईगंज पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.प्राप्त माहितीनुसार, धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील व्यापारी हिरण हलदार हा परिसरातील स्वस्त धान्य दुकानातून अवैधरित्या तांदूळ खरेदी करून तो शासनाच्या पोत्यांमधून काढून प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून मालवाहू वाहनातून (सीजी ०८- वाय ०३७९) देसाईगंज येथे विक्रीसाठी घेऊन जात होता. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी देसाईगंज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात वाहनाचा शोध घेतला. अडतिया बाबूराव खरकाटे यांच्या शेडसमोर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाची झडती घेतली. मुरूमगाव येथील व्यापारी हिरण हलदार यांच्या दुकानातून आणलेला हा तांदूळ देसाईगंज येथे कोणाकडे द्यायचा हे फोनवरून सांगितले जाणार असल्याचे वाहनचालकाने सांगितले. दरम्यान पोलिसांनी तिथे जाऊन कारवाई केली. यावेळी व्यापारी हलदार यांच्या मोबाईलवर पोलिसांनी संपर्क केला असता तो बंद असल्याचे आढळले. विशेष म्हणजे वाहनचालक किंवा त्याच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्याकडे त्या तांदळाची पावतीही नव्हती. त्यामुळे तो स्वस्त धान्य दुकानाचा असल्याची खात्री करून पंचनामा केला व तो तांदूळ आणि वाहन जप्त केले.याप्रकरणी आरोपी मुकेश सुरजन मडकाम व रोमेश अमरसाय कोठवार सर्व रा.मुरूमगाव यांच्याविरूद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, हवालदार नरेश सहारे, भाऊराव बोरकर, अंकुश धांडे, रुपाली चव्हाण, चंदू मोहुर्ले आदींनी केली.

टॅग्स :Crimeगुन्हा