शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

Gadchiroli: दम्यावरील औषध घेण्यासाठी उसळली ५० हजारांवर रुण्गांची गर्दी, मृग नक्षत्राच्या पर्वावर देसाईगंजात वितरण 

By दिगांबर जवादे | Updated: June 8, 2023 21:10 IST

Gadchiroli: मृग नक्षत्राच्या पर्वावर देसाईगंज येथे ८ जुन राेजी सांयकाळी ६ वाजेपासून दमा औषधीचे वितरण करण्यास सुरूवात झाली. ही औषधी घेण्यासाठी देशभरातील रूग्णांचे जत्थे ७ जुनपासूनच देसाईगंज येथे दाखल झाले.

- दिगांबर जवादेगडचिराेली  - मृग नक्षत्राच्या पर्वावर देसाईगंज येथे ८ जुन राेजी सांयकाळी ६ वाजेपासून दमा औषधीचे वितरण करण्यास सुरूवात झाली. ही औषधी घेण्यासाठी देशभरातील रूग्णांचे जत्थे ७ जुनपासूनच देसाईगंज येथे दाखल झाले. आपला नंबर लवकर लागावा यासाठी रूग्ण दुपारी ४ वाजेपासूनच रांगेत लागले. देशभरातून आलेल्या ५० हजार रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीने आदर्श इंग्लिश हायस्कुलचा प्रांगण फूलून गेला.

असाध्य अशा दमा आजाराची आयुर्वेदिक औषधी मागील ३९ वर्षांपासून वैद्यराज प्रल्हाद कावळे हे निशुल्क देत आहेत. या औषधीने अनेकांचा दमा आजार बरा झाला आहे. त्यामुळे ही औषधी घेण्यासाठी दरवर्षी रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यापूर्वी ही औषधी देसाईगंज तालुक्यातील काेकडी या गावात दिली जात हाेती. मात्र या ठिकाणी सुविधांअभावी रूग्णांची व त्यांच्यासाेबत आलेल्या नातेवाईकांची गैरसाेय हाेत हाेती. त्यामुळे यावर्षी दमा औषधीचे वितरण देसाईगंज येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी या औषधीचे वितरण वर्षातून एकदाच मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी केले जाते. त्यानुसार यावर्षी ८ जून राेजी वितरण करण्यात येत आहे. ८ जून राेजी सायंकाळी ६ वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत औषधीचे वितरण केले जाणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षानंतर औषध वितरण केले जात आहे.

औषध वितरणाच्या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, माजी मंत्री तथा आ. विजय वडेट्टीवार, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटाेले, आमदार कृष्णा गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष माेतीलाल कुकरेजा, नागरी बॅंकेचे अध्यक्ष प्रकाश पाेरेड्डीवार, माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, माजी नगराध्यक्ष शालू दंडवते, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवाणी, डाॅ. नितीन कोडवते, माजी सभापती परसराम टिकले, उपसभापती गोपाल उईके, माजी जिल्हा परिषद सदस्य रोशनी पारधी, माजी पंचायत समिती उपसभापती अर्चना ढोरे, मुख्याध्यापक दामाेधर सिंगाडे आदी उपस्थित हाेते.

थंड पाणी व जेवणाची माेफत व्यवस्थाऔषधी घेण्यासाठी आलेल्या रूग्णांना सेवा देण्यास देसाईगंज येथील नागरिक व स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. रांगेत लागलेल्या रूग्णांसाठी थंड पाण्याची व्यवस्था केली. स्वयंसेवक पाण्याची कॅन धरून रांगेत लागलेल्या रूग्णांपर्यंत पाेहाेचत हाेते. आराेग्य विभागाने रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली. तसेच डाॅक्टरांचे पथकही हाेते. सिंधू भवनात रूग्णांना माेफत जेवणाची व्यवस्था, गजानन महाराज मंदिरात झाेपण्याची व्यवस्था करण्यात आली. आरमाेरी, गडचिराेली, पुराडा, कुरखेडा येथून अतिरिक्त पाेलिसांची कुमक बाेलाविण्यात आली हाेती.

देशभरातील रूग्णदमा हा तसा असाध्य राेग समजल्या जाते. मात्र वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या औषधीने अनेकांना या राेगापासून कायमची मुक्ती मिळाली आहे. त्यामुळे ही औषधी घेण्यासाठी रूग्णांची संख्या दरवर्षी वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे ही औषधी वर्षातून एकदाच मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी दिली जाते. मागील ३९ वर्षांपासून ही औषधी याच दिवशी दिली जात आहे. छत्तीगड, तेलंगणा, मध्यप्रदेश राज्यासह महाराष्ट्राच्या कानाकाेपऱ्यातून रूग्ण दाखल झाले आहेत.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीHealthआरोग्य