शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

गडचिरोलीत रेडक्रॉसला ११ वर्र्षे पूर्ण

By admin | Updated: May 8, 2014 02:19 IST

जागतीकस्तरावर आरोग्यविषयक क्षेत्रात काम करणार्‍या रेडक्रॉस सोसायटीची गडचिरोलीत शाखा स्थापन होऊन ११ वर्ष पूर्ण झाले आहे.

सामाजिक काम : भामरागड, एटापल्ली तालुक्याच्या अनेक गावात आरोग्य सुविधा पोहोचविल्या

गडचिरोली : जागतीकस्तरावर आरोग्यविषयक क्षेत्रात काम करणार्‍या रेडक्रॉस सोसायटीची गडचिरोलीत शाखा स्थापन होऊन ११ वर्ष पूर्ण झाले आहे. या कालखंडात आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त भागात सर्वसामान्य लोकांना आरोग्यविषयक सेवा देण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रमातही रेडक्रॉस संस्थेने काम केले आहे. मार्च महिन्यात २००३ मध्ये गडचिरोलीत रेडक्रॉस सोसायटीच्यामार्फत काम सुरू झाले. जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड तालुक्यातील दुर्गम भागात रेडक्रॉस सोसायटीमार्फत अनेक समाजोपयोगी कार्य केले जात आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत करण्याच्या उद्देशाने रेडक्रॉस सोसायटीची स्थापना करण्यात आली. त्या अनुषंगाने रेडक्रॉस सोसायटीमार्फत कार्य केले जात आहे. अपघात, पूर, गारपीट, वादळ यासह नैसर्गिक आपत्तीच्यावेळी रेडक्रॉस सोसायटीमार्फत मदतीचे कार्य जिल्ह्यात केले जात आहे. एटापल्ली तालुक्यातील कोटमी येथे आरोग्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत एटापल्ली तालुक्यातील कोटमी गावासह २४ गावात आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात आल्या. यासाठी आरोग्यसेवक, नर्स व तज्ज्ञ डॉक्टरांकडून रूग्णांची तपासणी करण्यात आली. रूग्णांना मोफत गोळ्या, औषधी व इतर सुविधा पुरविण्यात आल्या. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात अधिक राहत असल्याने एटापल्ली तालुक्यात मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले. शेतकर्‍यांना शेतीसाठी लागणारे सुधारीत बी, बियाणे व भाजीपाला लागवड करण्यासाठी भाजीपाल्याचे बीज वितरीत करण्यात आले. पाण्याचा सदुपयोग करण्यासाठी घरालगत भाजीपाला लागवड करण्याचा उपक्रमही एटापल्ली तालुक्यात राबविण्यात आला. रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने भामरागड तालुक्यात शिबिर घेण्यात येत आहे.

तसेच एटापल्ली येथे सीटी चिकित्सालयमार्फत मोबाईल लॅनद्वारे मोफत औषधोपचार केले जात आहे. यासह अनेक आरोग्य विषयक सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. राजोली, पोटेगाव येथे ढगफुटी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांची वाताहत झाली होती. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण रेडक्रॉस सोसायटीतर्फे करण्यात आले. यात भांडी व अन्य साहित्याचा समावेश होता. ६५ सदस्य गडचिरोली जिल्हा रेडक्रॉस सोसायटीत सध्या आहेत. नितीन डवले हे या सोसायटीचे जिल्हाध्यक्ष आहेत. (शहर प्रतिनिधी)