शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

गडचिरोली-पाखांजूर बससेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:54 IST

गडचिरोली आगारातून छत्तीसगड राज्यातील पाखांजूर गावापर्यंत बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांना होणार आहे. सदर बस गडचिरोली-चातगाव-कारवाफा-गट्टा-पेंढरी-बोटेहूर-छत्तीसगड राज्यातील मायाकूर-पाखांजूरपर्यंत जाणार आहे.

ठळक मुद्देवाहक व चालकाचा सत्कार : दुर्गम भागातील प्रवाशांसाठी सोईचे

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : गडचिरोली आगारातून छत्तीसगड राज्यातील पाखांजूर गावापर्यंत बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांना होणार आहे.सदर बस गडचिरोली-चातगाव-कारवाफा-गट्टा-पेंढरी-बोटेहूर-छत्तीसगड राज्यातील मायाकूर-पाखांजूरपर्यंत जाणार आहे. या मार्गावर खासगी प्रवाशी वाहने अत्यंत कमी आहेत. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांची फार मोठी गैरसोय होत होती. जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुलमवार यांच्या नेतृत्त्वात गाव गणराज्य परिषद व तालुका निर्माण कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बससेवा सुरू झाली आहे. पेंढरी येथे बस पोहोचल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुलमवार यांनी चालक व वाहक यांचा सत्कार केला.ही बस सकाळी ७ वाजता गडचिरोलीवरून सुटेल व ९ वाजता पाखांजूर येथे पोहोचेल. सकाळी ९.१५ वाजता पाखांजूर वरून निघून ११.१५ वाजता गडचिरोली येथे पोहोचेल. पुन्हा दुपारी २ वाजता गडचिरोलीवरून हीच बस पाखांजूरसाठी सोडली जाईल. पाखांजूर वरून ४.१५ वाजता निघेल व गडचिरोली येथे ६.१५ वाजता पोहोचेल. या बसमुळे चातगाव ते पेंढरीपर्यत असलेल्या अनेक गावातील प्रवाशांसाठी सोयीचे झाले आहे.पेढरी परिसरातील एकूण ७० मागण्यांसाठी आंदोलन केले जात आहे. गडचिरोली ते पाखांजूर ही बससेवा सुरू करावी ही त्यातील एक मागणी आहे. आंदोलनानंतर ही बस सुरू करण्यात आली आहे. इतरही मागण्या सोडविण्यासाठी शासन व प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुलमवार यांनी लोकमतशी बोलतांना केली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ