शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावात गडचिरोलीचा समावेश नाही

By admin | Updated: November 6, 2014 22:54 IST

आगामी शैक्षणिक वर्षात नवीन वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमीओपॅथी, फिजिओथेरपी आणि बी.एस्सी नर्सींग महाविद्यालय सुरू करण्यासाठी २९ प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे दाखल झाले आहे.

गडचिरोली : आगामी शैक्षणिक वर्षात नवीन वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमीओपॅथी, फिजिओथेरपी आणि बी.एस्सी नर्सींग महाविद्यालय सुरू करण्यासाठी २९ प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे दाखल झाले आहे. मात्र या प्रस्तावात मागास गडचिरोली जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय देण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत बृहत आराखड्यानुसार वैद्यकीय शिक्षणाचे संपूर्ण राज्यात समन्यायी वाटप होण्याकरीता नियोजन तयार केले जात आहे. ३१ आॅक्टोबरपूर्वी असे प्रस्ताव विद्यापीठ दरवर्षी मागत असते. यंदा राज्यातून नव्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी २९ प्रस्ताव दाखल झाले आहेत. यामध्ये पाच प्रस्ताव हे नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठीचे आहे. यामध्ये पालघर, रायगड, नांदेड, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर दंत महाविद्यालयासाठी सांगली येथून एक प्रस्ताव आला आहे. आयुर्वेद विद्या शाखेसाठी बुलढाणा, सांगली, बीड जालना, कोल्हापूर तर होमीओपॅथीसाठी दोन प्रस्ताव आलेले आहे. ते नांदेड व सांगलीचे आहे. तसेच फिजिओथेरपीसाठी एकूण ६ प्रस्ताव आरोग्य विद्यापीठाकडे आहेत. यामध्ये सांगली, पुणे, ठाणे, औरंगाबाद, बुलढाणा, गोंदिया, नांदेड, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक येथील प्रस्तावाचा समावेश आहे. पूर्वविदर्भात गडचिरोली हा अतिमागास जिल्हा आहे. येथे आरोग्याच्या कोणत्याही सुविधा नाही. साधा पोलीस जवान चकमकीदरम्यान जखमी झाला. तरी त्याला नागपूर येथे खासगी रूग्णालयात तातडीने न्यावे लागते. गडचिरोलीत जिल्हासामान्य रूग्णालयामध्ये २०० खाटांची मंजुरी आहे. तर शहरातच महिला व बाल रूग्णालय नव्याने तयार होत आहे. येथेही २०० खाटांची व्यवस्था राहणार आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयासाठी पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर सध्या तयार आहे. महाविद्यालयासाठी लागणारी जागाही येथे उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे राज्य शासनाने स्वत: गडचिरोलीला वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत पुढाकार घ्यावा व जिल्ह्याचा प्रस्ताव तयार करून येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, अशी जिल्हावासीयांची मागणी आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करू, असे आश्वासन जनतेला दिले होते. राज्यात भाजपचे सरकार असल्याने त्यांनी आता वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)