शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील भूसंपादनाला गती! मुख्यमंत्री फडणवीसांचा १५ दिवसांचा अल्टीमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:22 IST

गडचिरोली विमानतळाच्या ओएलएस सर्वेक्षणाचे आदेश : प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानी १९ जून रोजी घेतला. यावेळी भंडारा- गडचिरोली द्रुतगती महामार्ग, रेल्वे तसेच विमानतळाचे भूसंपादन १५ दिवसांत पूर्ण करुन या प्रकल्पांना गती द्या, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

प्रकल्प रखडल्यामुळे त्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणांना टाईमलाईन दिलेली आहे. त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. सर्व यंत्रणा आणि संबंधित अधिकारी यांनी मिशन मोडवर काम करावे, भूसंपादनाची कामे गांभिर्याने घेऊन तातडीने मार्गी लावावीत. याबाबत सर्वांनी गुणात्मक आणि रचनात्मक काम करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते. 

भंडारा- गडचिरोली द्रुतगती मार्गाची सद्यस्थिती अशीभंडारा-गडचिरोली द्रुतगती मार्ग हा १५६ किमी लांबीचा आहे. पूर्व महाराष्ट्रातील महत्त्वाचा आणि प्रगत द्रुतगती मार्ग आहे, जो सध्या टप्प्याटप्प्याने विकसित होत आहे. पूर्ण झाल्यावर हा मार्ग भंडारा, गडचिरोली आणि नागपूरसारख्या शहरांना जलद आणि सुरक्षित दळणवळणाची सुविधा देईल. भूसंपादन प्रक्रिया सुरू असून यासाठी शासनाकडून निधी देखील आलेला आहे.

विमानतळाच्या ओएलएस सर्वेक्षणाचे आदेशगडचिरोली विमानतळाच्या धावपट्टीचा ओएलएस १ (अडथळा व मर्यादा) सर्वे करून घ्यावा आणि त्याचा प्रस्ताव गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी पाठवावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

वडसा - गडचिरोली रेल्वेमार्गाला गती द्यावीवडसा गडचिरोली रेल्वे मार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यास गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. १५ दिवसांत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश त्यांनी यंत्रणेला दिले.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस