शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli: अबुझमाड जंगलातील चकमकीत जहाल नक्षलवादी जोगन्ना ठार, शंभरवर गुन्हे दाखल

By संजय तिपाले | Updated: May 1, 2024 13:49 IST

Gadciroli News :  नक्षल चळवळीत सक्रिय सहभागी असलेला व शंभरवर गुन्हे दाखल असलेला जहाल नक्षलवादी नेता व विभागीय समिती सदस्य जोगन्ना उर्फ नरसय्या आणि विनय उर्फ अशोक (वय ७३) हा छत्तीसगडच्या अबुझमाड जंगलातील चकमकीत ठार झाला.

- संजय तिपाले गडचिरोली -  नक्षल चळवळीत सक्रिय सहभागी असलेला व शंभरवर गुन्हे दाखल असलेला जहाल नक्षलवादी नेता व विभागीय समिती सदस्य जोगन्ना उर्फ नरसय्या आणि विनय उर्फ अशोक (वय ७३) हा छत्तीसगडच्या अबुझमाड जंगलातील चकमकीत ठार झाला. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली सीमेवरील चकमकीत १० नक्षल्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले होते. यातील दोघांची ओळख पटली आहे.

जोगन्ना हा बेलमपल्ली (तेलंगणा) येथील रहिवासी आहे. अल्पशिक्षित असल्याने जोगन्ना चळवळीत मोठ्या पदावर गेला नाही. परंतु प्रत्येक योजनेत त्याचा सहभाग असायचा. दक्षिण आणि उत्तर गडचिरोलीत त्याचा वावर होता. तो भूमिगत होऊन अबुझमाडमध्ये वास्तव्यास होता. अखेरच्या काळात तो  एटापल्ली, धानोरा आणि अहेरी तालुक्यात सक्रिय होता. गडचिरोलीत त्याच्यावर शंभरहून अधिक गुन्हे दाखल असून २० लाखांपेक्षा अधिक बक्षीस होते. त्याच्या मृत्यूने नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. त्याच्यासोबत ठार झालेला दुसरा नक्षली विनय हा नक्षल्यांचे आर्थिक नियोजन सांभाळायचा. दरम्यान, उर्वरित आठ जणांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कथित अपहरण प्रकरणात प्रमुख भूमिका२०१० राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी श्रीनिवास गोडसेलवार यांचे नक्षल्यानी अपहरण केले होते. यात जोगन्नाची महत्त्वाची भूमिका होती. गोडसेलवार यांना नक्षल्यांनी नऊ दिवस ओलीस ठेवले होते. आर. आर. पाटील हे तेव्हा गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यांनी गोडसेलवार यांच्या सुटकेसाठी यंत्रणा गतिमान केली होती.जवानांनी कोरनारच्या जंगलात नक्षल्यांच्या ‘कॅम्प’वर हल्ला केला होता. यावेळी मोठी चकमक उडाली होती. त्यात केंद्रीय समिती सदस्य भूपती व जोगन्ना बालंबाल बचावले होते. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली